मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी ९४ रुग्ण सेवाग्राम रुग्णालयात दाखल
२०९ रुग्णांची केली तपासणी
नांदाफाटा/कोरपना, नितेश शेंडे – एकलव्य इंग्लिश मीडियम स्कुल, नांदाफाटा येथे विनामूल्य मोतीबिंदू डोळे तपासणी शिबीर व विनामूल्य कृत्रिम भिंगारोपण मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन ३० ऑक्टोबरला पार पडले. सदर शिबिरात २०९ नागरिकांची तपासणी करण्यात आली. ४४ महिला व ५० पुरुष अशा एकूण ९४ रुग्णांना मोतीबिंदू शस्त्रक्रियेकरिता सेवाग्राम येथे पाठविण्यात आले आहे.
लॉयन्स आय सेंटर सेवाग्राम वर्धा, महावीर इंटरनॅशनल चंद्रपूर सेंटर, लायन्स क्लब ऑफ चंद्रपूर क्वीन्स, राष्ट्रसंत युवा मंडळ बिबी, विवेकानंद युवा मंडळ नांदा व नांदा शहर युवक मित्रमंडळ यांचेकडून सदर शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी सेवाग्राम येथील प्रमुख डॉ. शुक्ला, सेवाग्राम कॉलेज वर्धा तर्फे डॉ. अजय शुक्ला, डॉ. अझहर शेख, डॉ. हर्षल हायदावे, डॉ. गौरव माळवे, डॉ. प्रांजल जैन, सामाजिक कार्यकर्ते सचिन ताकसांडे, अविनाश भोंगळे, यांचेसह १२ डॉक्टरांची चमू, महावीर इंटरनेशनल चंद्रपूरचे नर्पतचंद भंडारी, केंद्र अध्यक्ष हरीश मुथा, मनिष खटोड, धनंजय छाजेड, राजू खटोड, डॉ. कुलभूषण मोरे, हरिभाऊ मोरे यांची उपस्थिती होती.
शिबिराच्या यशस्वितेसाठी प्रा. आशिष देरकर, पुरुषोत्तम निब्रड, अभय मुनोत, सतीश जमदाडे, डॉ. स्वप्नेश चांदेकर, नितेश शेंडे, अखिल अतकारे, महेश राऊत, उमेश राजुरकर, शैलेश लोखंडे, गणेश तुराणकर, कल्पतरू कन्नाके, मुन्ना मासिरकर, योगेश काटकर, प्रफुल वानखेडे, शामकांत पिंपळकर, गणेश लोंढे, नरेंद्र अल्ली, रवी गलेपल्ली, गौतम जुमडे आदींनी सहकार्य केले.
परिसरातील नांदा, आवारपूर, बिबी, तळोधी, खिर्डी, गडचांदूर, वनोजा, आंबेझरी, नारंडा, सोनुर्ली, टाकळी, पिंपळगाव, नांदाफाटा, मांडवा, सावलहिरा, बाखर्डी, टेकामांडवा, लक्कडकोट, बैलमपुर, आसन, जांभुळदरा, राजुरगुडा, अंतरगाव, नवेगाव, नोकरी, नायगाव, कवठाळा, चन्नई, कोल्हापूरगुडा, लखमापूर, कारगाव, केमारा, मेहंदी इंजापूर इत्यादी गावातील रुग्णांनी मोफत मोतीबिंदू शिबिराचा लाभ घेतला.