तहसीलदार गाडे यांच्या हस्ते सानुग्रह अनुदान धनादेश वाटप
राजुरा : तालुक्यातील चुनाळा येथे ऑगस्ट महिन्याच्या शेवटी विजेच्या कळकटासह झालेल्या जोरदार पावसात वीज पडून मृत पावलेल्या पाच बकऱ्यांची नुकसान भरपाई म्हणून राजुरा तहसिलदार हरीश गाडे यांनी सानुग्रह अनुदानाचे धनादेश शेळी मालकांना (दि. २८) वाटप केले.
चुनाळा येथील भगवान पानसे यांच्या मालकीच्या तीन शेळ्या, अनुसयाबाई ठेंबरे यांची एक शेळी व अनिल वांढरे यांची एक शेळी २९ ऑगस्ट रोजी गावाबाहेर चारा खाण्यासाठी गेली असता वीज पडून पाचही शेळ्या जागेवर मृत पावल्या असता महसूल विभागाने तात्काळ पंचनामा करून शेळी मालकांना लवकर नुकसान भरपाई म्हणून सानुग्रह अनुदान देण्यासाठी तहसीलदार हरीश गाडे यांनी तहसिल कार्यालयात सानुग्रह अनुदानाचे धनादेश वाटप केले.
यावेळी तहसीलदार हरीश गाडे, मंडळ अधिकारी निरंजन गोरे, चुनाळाचे सरपंच बाळनाथ वडस्कर, तलाठी विल्सन नांदेकर, लिपिक ललिता मारकड, भगवान पानसे, अनुसयाबाई ठेंबरे, अनिल वांढरे उपस्थित होते.