पोलीस स्टेशन चामोर्शीच्या वतीने पारंपारिक आदिवासी रेला नृत्य स्पर्धा संपन्न
पोलीस स्टेशन चामोर्शी च्या वतीने आदिवासी रेला नृत्य स्पर्धेचे आयोजन 29/10/2021 रोजी मा.पोलीस अधीक्षक अंकित गोयल सा. मा.अप्पर पोलीस अधीक्षक समीर शेख सा. मा.अप्पर पोलिस अधीक्षक सोमय मुंडे सा. यांच्या संकल्पनेतून तसेच मा.उपविभागीय पोलीस अधिकारी गडचिरोली प्रणिल गिल्डा सा. यांच्या मार्गदर्शनात पोलीस स्टेशन चामोर्शी यांचे वतीने जुने उपविभागीय अधिकारी कार्यालय चामोर्शी येते पारंपारिक आदिवासी रेला नृत्य स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.
सदर कार्यक्रमाचे उदघाटक मा. तहसीलदार जितेंद्र शिकतोडे साहेब तसेच कार्यक्रमास अध्यक्ष बिपीन शेवाळे पोलीस निरक्षक साहेब पोस्टे चामोर्शी. कार्यक्रमास लाभलेले प्रमुख पाहुणे पोस्टे हद्दीतील पोलीस पाटील भगीरथ भांडेकर वालसरा, श्रीरंग माशाखेत्री भेंडाळा, बबिता उराडे कर्क्कापल्ली, ईश्वर झाडे हळदी मा. मारोती कुळमेथे आदी मान्यवरांचे हस्ते माता स्वरस्वती व वीर बाबुराव शेळमके यांचे प्रतिमेला पुष्प अर्पण करुन व दीप प्रज्वल करुन कार्यक्रमास सुरवात करण्यात आली. आदिवासी पारंपारिक रेला नृत्य स्पर्धेचे चे गुणलेखक म्हणून रतन दुर्गे व सौ. रोशनी वरगंटे हे उपस्थीत होते. तसेच पोस्टे हद्दीतील 08 रेला ग्रुपने सहभाग नोंदविला व कार्यक्रमास 150 ते 200 ग्रामस्तानी उपस्थिती होते. प्रत्येक डान्स ग्रुपने अतिशय चांगले नृत्य सादर केले. त्या मधून पंचांनी अनु क्र. नंबर दिले. पहिला क्र. डी वायरस गँग चामोर्शी. दुसरा क्र.बिरसामुंडा रेला ग्रुप वालसरा व तसेच तिसरा क्र. बिरसामुंडा रेला ग्रुप कर्कापली या संघानी पटकाविले या प्रमाणे अनुक्रमे विजेत्या संघांना 3000 रू,2000 रू,1000 रू. रोख पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. तसेच सहभागी सर्व रेला डान्स टीम ला प्रोत्साहन पर बक्षीस देण्यात आले व पोस्टे हद्दीतील अती संवेदनशील मुतनूर या गावातील सहभागी रेला टीमला व्हॉलीबॉल भेट देण्यात आला.
कार्यक्रमास सहभागी सर्व स्पर्धकांना व उपस्थिती ग्रामस्थांना अल्पोहार ची व्यवस्था करण्यात आली होती. सदर आदिवासी रेला नृत्य कार्यक्रमाचे सूत्र संचालन मपो उपनि पल्लवी वाघ यांनी केले. कार्यक्रमास पोस्टे चामोर्शी चे सर्व पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार हजर होते.