पत्रकारांशी उर्मटपणे वर्तणूक करणाऱ्या एपीआय वर कारवाई करा – पुरोगामी पत्रकार संघाची निवेदनातून मागणी
राजुरा/चंद्रपूर : अपघातस्थळी पोलीस प्रशासनाला सहकार्य करणारे नवभारत प्रतिनिधी अमोल राऊत यांच्याशी राजुरा येथील एपीआय गोडसे व सोबत असलेली पोलीस चमू यांनी उर्मटपणे वर्तन केले. या पोलीस प्रशासनातील असभ्य वर्तणूक करणाऱ्या पोलीस अधिकारी व कर्मचारी यावर कारवाई करण्याची मागणी काल पुरोगामी पत्रकार संघाने पोलीस अधीक्षक चंद्रपूर यांच्याकडे केली.
सविस्तर वृत्त असे की, चार दिवसागोदर राजुरा तालुक्याच्या ठिकाणापासून दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या सुमठाणा फाट्यावर दुचाकी दुर्दैवी अपघात झाला. या अपघातात दोन भावंडांपैकी एकाचा जागीच मृत्यू तर दुसरा गंभीर झाला होता. या प्रकाराची माहिती राजुराचे नवभारत प्रतिनिधी तसेच पुरोगामी पत्रकार संघाचे तालुका संपर्क प्रमुख अमोल राऊत यांनी राजुरा पोलिस स्टेशनला दूरध्वनी वरून देत सहकार्याची भूमिका निभावली. पोलीस घटनास्थळी येईपर्यंत जखमीला उपचारार्थ रुग्णालयात नेण्याची व्यवस्था केली. मात्र राजुरा येथील एपीआय गोडसे सह आलेल्या पोलिस चमूने प्रशासनाला सहकार्य करणारे अमोल राऊत यांच्याशी अकारण हुज्जत घालत असभ्य वर्तणूक करत प्रशासनालाच मलिन केले. यामुळे सामान्य माणसाशी पोलिसांची भूमिका व वर्तणूक किती असहाय आहे याचे यावेळेस दर्शन एपीआय गोडसे यांच्या वर्तणुकीतून घडले. अशा पोलिस प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण करून मालिन करणाऱ्या एपीआय व सोबत असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करावी. जेणेकरून यानंतर अशा असभ्य वर्तणुकीला आळा बसेल व सामान्य जनतेत पोलिस प्रशासनाबद्दल आपुलकीची भावना टिकून राहील. अशी मागणी निवेदनातून केली आहे. यावेळी पुरोगामी पत्रकार संघाचे पूर्व विदर्भ अध्यक्ष नरेंद्र सोनारकर, मिलिंद नरांजे, जिल्हा संघटक चंद्रपूर निलेश ठाकरे, तालुका अध्यक्ष चंद्रपूर मुन्ना तावाडे, संपर्क प्रमुख राजुरा तथा नवभारत प्रतिनिधी अमोल राऊत उपस्थित होते. महाराष्ट्र राज्य गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, चंद्रपूरचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार, पोलीस महासंचालक यांनाही निवेदन पाठविण्यात आले.