लोकसहभागातून होत आहे वनराई बंधाऱ्याची निर्मिती ; चेक आष्टा येथे वनराई बंधारा
पोंभुर्णा, जयदेव मडावी – तालुक्यातील मौजा चेक आष्टा ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या मदतीने वनराई बंधारे बांधण्याच्या मोहीमेला प्रारंभ करण्यात आला. चेक आष्टा ग्रामस्थांच्या मदतीने ग्राप चेक आष्टा यानी वनराई बंधाऱ्याचे नियोजन करुन उत्तम प्रतिचा वनराई बंधारा तयार केला.
वनराई बंधारा प्रसंगी ग्रा.पं. सरपंच कांताताई मडावी, ग्रा.पं. सदस्य जयंत पिंपळशेंडे, सरीता मरस्कोल्हे, ग्रामसेवक मनोज मुडावार, स्वच्छाग्रही जयदेव मडावी, ग्राम रोजगार सेवक शामसुंदर कुसराम निखिल मडावी, सरीता शेडमाके तसेच आदी ग्रामस्थांची उपस्थीती होती.
याप्रसंगी वनराई बंधाऱ्यामुळे पाण्याच्या साठा मध्ये वाढ होऊन त्याचा शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारे लाभ होईल. याचा फायदा शेतकऱ्यांना होईल याविषयी मुडावार यांनी माहिती दिली.