चंद्रपूर जिल्ह्याकरिता आवश्यकतेनुसार महामंडळाच्या ५० अतिरिक्त बसेस उपलब्ध करा – आ. किशोर जोरगेवार
परिवहन मंत्री अनिल परब यांना निवेदन
चंद्रपूर जिल्हातील वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत महामंडळच्या एस.टी बसेस कमी पडत असल्याने प्रवासी वाहतूक प्रभावित होत असून बसेसची कमतरता लक्षात घेता फेऱ्या कमी करण्यात आल्याने नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत असून अतिरिक्त भाडे देऊन खाजगी प्रवासी वाहनाने प्रवास करावा लागत आहे. ही बाब लक्षात घेता चंद्रपूर जिल्हाकरिता महामंडळने 50 अतिरिक्त बसेस उपलब्ध करुन द्यावात अशी मागणी आमदार किशोर जोरगेवार यांनी परिवहन मंत्री अनिल परब यांना केली आहे.
आमदार किशोर जोरगेवार यांनी आज गुरुवारी मुबंई मंत्रालय येथे परिवहन मंत्री अनिल परब यांची भेट घेतली असून सदर मागणी संदर्भात सविस्तर चर्चा केली आहे.
चंद्रपूर जिल्हा औद्योगिक प्राश्वभूमी आणि पर्यटन साठी प्रसिद्ध आहे. तसेच चंद्रपूर जिल्ह्यात विविध प्रकारचे उद्योगधंदे प्रस्तापित असून राज्यातील सर्वात मोठे विद्युत प्रकल्प येथे स्थित आहे. पोलाद, सिमेंट, कागद, रासायनिक, उद्योगांसोबत मँगनीज, लोह, कोळसा या सारख्या खनिजसंपत्तीच्या खाणी मोठ्या प्रमाणात चंद्रपूरात अस्तित्वात आहे. त्यामुळे या ठिकाणी प्रचंड मोठ्या प्रमाणात कामगार वर्ग स्थायिक आहे. या कामगार वर्गाला आर्थिक दृष्ट्या खाजगी प्रवासी वाहतूक परवडण्या सारखी नाही. त्यामुळे बहुतांश कामगार वर्ग हा प्रवासी वाहतूकीकरिता महामंडळच्या बसेसला प्राधान्य देतो. त्याचप्रमाणे इतर सामान्य नागरिक व विद्यार्थी वर्ग सुद्धा ग्रामीण भागातून इतर भागात प्रवासाकरिता मोठ्या प्रमाणात एस.टी. बसेस नी प्रवास करतात. ग्रामीण भागाला जिल्ह्यातील महत्वपूर्ण शहरांना जोडण्याचे काम महामंडळच्या बसेस द्वारे होत असते. त्यामुळे खाजगी प्रवासी वाहतुकीच्या तुलनेत सवलतीच्या दरात महामंडळच्या एस.टी. बसेसला नागरिकांकडून प्राधान्य दिले जाते. परंतु जिल्ह्याच्या वाढत्या लोकासंख्याच्या तुलनेत उपलब्ध महामंडळच्या एस. टी. बसेस कमी आहे. आज स्थितीत चंद्रपूर जिल्ह्याला केवळ २४५ बसेस उपलब्ध आहे. त्यातील २० ते २५ बसेस अकार्यक्षम आहे. अश्या स्थितीत जिल्ह्याला बसेसचा अत्याधिक तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील बस फेऱ्या कमी करण्यात आलेल्या आहे. परिणामी कामगार वर्ग, सामन्य नागरिक व विद्यार्थ्यांना अतिरिक्त भाडे देऊन खाजगी प्रवासी वाहणाने प्रवास करावा लागत आहे. त्यामूळे जिल्हाला अतिरिक्त 50 बसेसची गरज असून ती पूर्ण करण्यात यावी अशी मागणी यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी परिवहन मंत्री अनिल परब यांना केली आहे.