स्वाभिमानी नागपूरकर जनताच दाखवेल ‘बसपा’ला सत्तेचा मार्ग !
शासनकर्ती जमात होण्यासाठी ‘धम्मनगरी’सज्ज
बसपा प्रदेशाध्यक्ष अँड. संदीप ताजने यांचे प्रतिपादन
मुंबई, २७ ऑक्टोबर
राज्यभरात अनुसूचित जाती,अनुसूचित जमाती,ओबीसी तसेच अल्पसंख्यांकांवरील अत्याचारात वाढ झाली आहे. भाजप आणि महाविकास आघाडीच्या कार्यकाळात पीडित,शोषित,उपेक्षित मुख्य प्रवाहापासून आणखी दूर ढकलले गेले आहेत. ‘आहे रे आणि नाही रे ‘ यांच्यातील दरी आणखी वाढत आहे.अशात समाजाचा स्वाभिमान जिवंत ठेवून शासनकर्ती जमात तयार करण्याचे काम नागपूरकर जनता करेल, असा आशावाद बहुजन समाज पार्टी चे प्रदेशाध्यक्ष अँड. संदीप ताजने यांनी बुधवारी व्यक्त केला.
नागपूर मध्ये आयोजित कार्यक्रमात कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांना संबोधित करतांना त्यांनी महाविकास आघाडी सरकारच्या धोरणावर टीका केली. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी नागपूर मधून सामाजिक क्रांती घडवून आणली. असंख्य कुळांचा उद्धार धम्मचक्र प्रवर्तन सोहळ्या नंतर झाला. परंतु, महाराष्ट्रात अद्याप ही डॉ.बाबासाहेबांच्या विचारांनुसार शासनकर्ती जमात होणाचे स्वप्न प्रत्यक्षात नावारूपास आलेले नाही. माननीय बहन मायावती यांच्या मार्गदर्शनाखाली सत्तेतील ही पोकळी बसपा भरून काढेल, असे यावेळी अँड. ताजने म्हणाले.
शोषित, पीडितांना मुख्यप्रवाहात आणून त्यांना शासनकर्ते बनवण्यासाठी केवळ बसपाच एकमेव पर्याय आहे. येत्या नागपूर महानगर पालिका निवडणुकीत शिवसेना, भाजप, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस ला त्यांची जागा दाखवून देण्याचे का बसपा करेल, असा दावा त्यांनी यानिमित्त केला. नागपूर जनता खंबीर पणे बसपाच्या पाठीशी उभी आहे. समाजकारणासाठी ‘सत्ता’ असे सरळ ध्येय बसपाचे आहे, असे ते म्हणाले. यामुळे निवडणुकांच्या अनुषंगाने तयारीला लागण्याच्या सूचना त्यांना कार्यक्रमातून केल्या.
कार्यक्रमात प्रदेश कोषाध्यक्ष महेंद्र रामटेके, प्रदेश महासचिव सुनील डोंगरे, नागोराव जयकर, प्रदेश सचिव अविनाश वानखेडे, जिल्हा प्रभारी नितीन शिंगाडे, विजयकुमार डहाट, जिल्हा अध्यक्ष संदीप मेश्राम, मनपा गटनेते जितेंद्र घोडेस्वार, शहर अध्यक्ष राजीव भांगे, शहर उपाध्यक्ष शादाफ भाई यांच्या सह शहरातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.