इंदिरानगर परिसरातील हनुमान टेकडी येथे पायाभूत सुविधा तात्काळ उपलब्ध करा
यंग चांदा ब्रिगेडची मागणी, मनपा आयुक्तांना निवेदन
इंदिरानगर येथील हनुमान टेकडी येथे पायभूत सुविधांचा अभाव असून सुविधान अभावी येथील नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामूळे या भागात तात्काळ पायाभूत सुविधा उपलब्ध करुन देण्यात याव्यात अशी मागणी यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने करण्यात आली असून सदर मागणीचे निवेदन त्यांच्या वतीने मनपा आयुक्त राजेश मोहिते यांना देण्यात आले आहे. यावेळी यंग चांदा ब्रिगेडचे आदिवासी विभागाचे जिल्हाध्यक्ष जितेश कुळमेथे, संघटक आनंद इंगळे, राम जंगम, नरेश आत्राम, नरेश मुलकावार, शकील शेख, बंडू पटले यांच्यासह स्थानिक नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
इंदिरानगर येथील हनुमान टेकडी परिसरात दाट लोकवस्ती आहे. मात्र येथे नाली रस्ता नसल्याने घरातून निघणारे सांडपाणी रस्त्यावर वाहते. परिणामी परिसरात दुर्गंधी पसरलेली आहे. परिसरातील खुल्या जागेवर झाडे झुडपी तयार झाली आहे. परिसरातील सांडपाणी याच जागेवर साचत असल्याने या भागात घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. त्याचाच फायदा घेत परिसरातील डुकरे या भागात हैदोस घालत आहे. या सर्व प्रकारामुळे तेथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून परिसरातील नागरिकांना डेंग्यू, ताप, हिवताप, डायरिया अशा रोगांची वांरवार लागण होत आहे. त्यामूळे या भागाचा विकास करुन येथे पायाभूत सुविधा उपलब्ध करण्यात याव्यात अशी मागणी सदर निवेदनाच्या माध्यमातून यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने महानगर पालिका आयुक्त राजेश मोहिते यांना करण्यात आली आहे. मागणी मान्य न झाल्यास तिव्र आंदोलन करण्याचा ईशाराही यावेळी यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने देण्यात आला आहे.