धक्कादायक…! बामनवाडा ग्रामपंचायतीचा महाप्रताप
ग्रामपंचायत सदस्यांना माहिती न देता ग्रामसेवकाला हाताशी धरून सरपंच भारती पाल यांचा दारू भट्टी सुरू करण्याचा केविलवाणा प्रयत्न
सरपंच भारती पाल यांच्या देशी दारू भट्टी सुरू करण्याच्या डावाला सुजाता मेश्राम यांच्या कडून खिंडार
व्यसनमुक्त गाव करणे हेच खरे धोरण – सदस्या सुजाता मेश्राम
राजुरा / प्रतिनिधी
राजुरा तालुक्यातील बामनवाडा येथील देशी दारू भट्टी वरून चांगलेच राजकारण तापले असून बामनवाडा ग्रामपंचायत च्या सरपंच भारती पाल, ग्रामसेवक व काही सदस्य मिळून देशी दारू भट्टी सुरू करण्याचा कट रचला होता सदर कटाची भनकही काही सदस्यांना होऊ दिली नाही. दिनांक 28/10/2021 ला ग्रामसभा ठेवली असून ग्रामसभेच्या विषय क्रमांक दोन वर सरकार मान्य देशी दारू ला ना हरकत प्रमाणपत्र देणे बाबत असा विषय नोटीस वर नमूद आहे.
सदर ग्रामसभेचा नोटीस सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रसारित करण्यात आल्याने ग्रामपंचायत सदस्या सुजाता मेश्राम यांना ही माहिती मिळाली असल्याने त्यांनी या प्रकाराचा तीव्र निषेध केला असून गावात हनुमान मंदिर, जिल्हा परिषद शाळा, बौद्ध विहार ही सामजिक व शैक्षणिक स्थळे असल्याने गावकऱ्यांचा देशी दारुभट्टी ला विरोध आहे याची दखल सुजाता मेश्राम यांनी घेतली आहे.
भारती पाल यांना सरपंच होण्यासाठी आलेला खर्च कुठून काढावा या विवंचनेत त्यांचे कुटुंब असल्याने अशा प्रकारचे घातक निर्णय सरपंच्या भारती पाल यांच्याकडून होताना दिसत आहे.
गावात अनेक अवैध दारू विक्री करीत असल्याने सदर विक्री एका ग्रामपंचायतच्या सदस्याच्या मेहरबानी मुळे सुरू असून त्या सदस्याने पुढे असे कृत्य केल्यास त्याला त्याचे फळ भोगावे लागतील अशी दबकी चर्चा गावात सुरू आहे. मात्र दारू भट्टी ला ग्रामपंचायत सदस्य सुजाता मेश्राम यांनी विरोध केल्याने अनेक पदाधिकाऱ्यांचे आर्थिक लाभ संपुष्टात येण्याची शक्यता आहे.
दारू भट्टी सुरू करण्यासाठी आम्ही बचत गटाच्या महिलांना आर्थिक लाभ देऊ व दारू भट्टी सुरू करण्याचा ठराव मंजूर करून घेऊ अशी भूमिका एका सदस्याने घेतली असल्याने बामनवाडा येथील महिला त्याचे विरोधात संताप व्यक्त करीत आहेत.
ग्रामपंचायत च्या सदस्या सुजाता मेश्राम यांनी गावाच्या भविष्यासाठी पुढाकार घेत देशी दारू भट्टीला विरोध करीत असल्याने त्यांचे जिल्हाभरात कौतुक केल्या जात असून आर्थिक लोभा पोटी दारू भट्टी सुरू करण्याचा कट रचणाऱ्या पदाधिकाऱ्यांवर छी-थू केल्या जात आहे.