वनपरिक्षेत्रातील वनरक्षकाचा घरात मृतदेह आढळल्याने खळबळ
यवतमाळ, मनोज नवले
गांधी नगर येथे भाडयाने राहत असलेल्या वनरक्षकाचा मृतदेह घरात आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे.मृतदेह आढळल्याची माहिती त्यांच्या नातेवाईकांना मिळताच त्यांनी तात्काळ येथील उपजिल्हा रूग्णालयात दाखल केले असता संबंधीत डॉक्टरांनी त्याला मृत घोषीत केले आहे.
मृतदेह उपजिल्हा रूग्णालयात आल्याची माहिती डॉ.कैलास राठोड यांचे कंपाऊटरांनी वसंत नगर पोलीसांना दिली असता मर्ग दाखल करण्यात आला आहे.
अमोल बापुराव दिवे वय २७ वर्षे रा.दारव्हा असे मृत वनरक्षकाचे नाव आहे.वसंत नगर पोलीसांकडुन मिळालेल्या माहितीनुसार अमोल दिवे हे मुळचे दारव्हा येथील रहिवाशी असुन ते पुसद वनविभागातील शेंबाळपिंप्री वनपरिक्षेत्रात नुकतेच कार्यरत झाले होते.वनरक्षक अमोल दिवे वसंत नगर पोलीस स्टेशनच्या हददीत रूम करून भाड्याने राहत होते.घटनेच्या दिवशी दि.१९ आक्टोंबर रोजी नेहमीप्रमाणे कर्तव्य बजावुन ते गांधी नगर येथे रूमवर गेले होते.घटनेच्या दिवशी रात्री ३.३० वाजताच्या दरम्यान त्यांचा मृतदेह आढळुन आला असता त्यांना तात्काळ येथील उपजिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले.मात्र मृत्यु होवुन बराच वेळ लोटल्याने त्यांचे शरीर पुर्ण कडक झाले होते.त्यामुळे त्यांचा मृत्यु होवुन बराच वेळ झाला असावा असा अंदाज सरकारी दवाखान्यामधील डॉक्टरांनी व्यक्त केला आहे.कदाचीत त्यांचा मृत हृदय विकाराच्या झटक्याने झाला असावा असाही अंदाज लावल्या जात असुन शवविच्छद अवाहल मिळाल्यानंतर मृत्युचे कारण कळु शकणार आहे.