न्यूरो संबधित आजरावरील उपचारा करिता कायम स्वरुपी तज्ञ डाॅक्टरांची नियुक्ती करा

0
728

न्यूरो संबधित आजरावरील उपचारा करिता कायम स्वरुपी तज्ञ डाॅक्टरांची नियुक्ती करा

यंग चांदा ब्रिगेडची मागणी, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठातांना पत्र

 

न्युरो संबधित उपचारा करिता चंद्रपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालय येथे कायम स्वरुपी तज्ञ डाॅक्टर नसल्याने रुग्णांना नागपूर किंव्हा खाजगी रुग्णालयात जावे लागत आहे. ही बाब लक्षात घेता सर्व सामान्य नागरिकांना सदर आजारावरील उपचार जिल्हा सामान्य रुग्णालयातच घेता यावा या करिता येथे कायम स्वरुपी न्युरो सर्जन डाॅक्टरांची नियुक्ती करण्यात यावी अशी मागणी यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने करण्यात आली असून सदर मागणीचे निवेदन त्यांच्या वतीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डाॅ. अशोक नितनावरे यांना देण्यात आले आहे. यावेळी यंग चांदा ब्रिगेडच्या महिला आघाडीच्या शहर संघटीका वंदना हातगावकर, दुर्गा वैरागडे, आशा देशमूख, भाग्येश्री हांडे आदिंची उपस्थिती होती.

 

चंद्रपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्याल, रुग्णालय येथे जिल्हासह लगतच्या जिल्हातील रुग्णही मोठ्या संख्येने उपचारा करिता येतात. मात्र येथे स्वरुपी कायम स्वरुपी न्युरो सर्जन नसल्याने सदर आजारा संबधित रुग्णांना नागपूर येथील रुग्णालयात रेफर करण्यात येते. किंव्हा सदर रुग्ण हा खाजगी रुग्णालयात उपचार घेतो मात्र या आजाराचा उपचार खर्च महाग असल्याने तो सर्वसामान्यांना न परवडण्यासारखा आहे. अशात रुग्णांना आर्थिक व मानसीक त्रास सहण करावा लागतो. ही बाब लक्षात घेता चंद्रपूर येथील रुग्णालयातच सदर आजारावर उपचार करता यावा या करिता येथे कायमस्वरुपी न्युरो सर्जन उपलब्ध करुन देण्यात यावा अशी मागणी यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने करण्यात आली आहे. तसेच ओपीडी वार्ड नंबर 12 येथे डाॅक्टरांना नियमीत उपस्थित ठेवण्यात यावे, वार्ड नंबर 2 आणि 3 मध्ये तज्ञ डाॅक्टरांची नियुक्ती करण्यात यावी, प्रसुती वार्डात शुध्द पिण्याच्या पाण्याची सोय उपलब्ध करण्यात यावी अशी मागणीही सदर निवेदनाच्या माध्यमातून यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता यांना करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here