धम्म आचरणानेच जीवनाचे कल्याण – महास्थविर ज्ञानज्योती
सम्राट अशोका बुद्धविहार खडसंगी येथे महाबोधी वृक्षारोपण
तालुका प्रतिनिधी
चिमूर
सम्यक संबुद्धाचा धम्मच मानवी जीवनाच्या कल्याणाचा अंतरिम मार्ग आहे, आणि या सद्दधम्माच आचरण करणाऱ्या व्यक्तीचं सदैव कल्याण होते.असं प्रतिपादन महस्थाविर भदंत ज्ञानज्योती यांनी केलं.
ते खडसंगी येथील सम्राट अशोका बुद्धविहार येथे अश्विनपौर्णिमेच्या पर्वावर आयोजित महाबोधी वृक्षारोपण कार्यक्रमात धम्मदेसना करताना संबोधित होते.पुढे समाजबांधवांना मार्गदर्शन करताना त्यांनी धम्मात महाबोधी वृक्षाच महत्व विषद केलं, रोपण करण्यात आलेल्या वृक्षाची जोपासना करण्याचं आवाहन त्यांनी केलं.
या वेळी महास्थाविर भदंत ज्ञानजोती व भिक्खू संघ संघारामगिरी यांचं समाजबांधवांनी वंदन करीत पुष्पवृष्टीने स्वागत केलं. संघाच्या हस्ते महामानव बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास माल्यार्पण करून भदंत ज्ञानज्योती यांच्या हस्ते विधिवत महाबोधी वृक्षाच रोपण करण्यात आलं. व सामूहिक बुद्ध वंदना ग्रहण करण्यात आली.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उपसरपंच आदित्य वासनिक, भीमज्योती संस्थेचे अध्यक्ष धर्मेंद्र रामटेके,असित मानकर, सुधाकर लोणारे, अभिमान राऊत,अरविंद पाटील, गौतम रामटेके, राजू गेडाम, अक्षय भीमटे, बेबीताई भोवते, पुष्पा गजभिये, बेबी फुलझेले,सिंधू रामटेके आदींनी परिश्रम घेतले.