गोंडवानाच्या शिलेदारांना कुण्या लाचाराच्या सर्टिफीकेटची गरज नाही – जिल्हाध्यक्ष बापुराव मडावी
प्रतिनिधी कोरपना – कोकीळेला स्वत:ची भाषा आहे म्हणून ती स्वतंत्र आहे.पिंजऱ्यातील पोपटाला मालकाची भाषा बोलावी लागते कारण तो कैद झालेला गुलाम असतो. गोंडवाना गणतंत्र पार्टी च्या माध्यमातून गोंडवाना समग्र विकास क्रांती आंदोलनांची ज्योत पेटविणारे गोंडवाना चे सच्चे शिपाई आज वैचारिक दृष्ट्या सक्षम आहे. समाजाला जागृत करण्यासाठी त्यांना कुण्या लाचार चमचांच्या सर्टिफीकेटची गरज नाही. असे विचार जिल्हाध्यक्ष बापुराव मडावी यांनी कोरपना येथिल कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना व्यक्त केले.
गोंडवाना गणतंत्र पार्टी कोरपना तालुका पदाधिकारी निवड करणे व आगामी ग्रामपंचायत,पं.स., जि.प. नगर पंचायती निवडणूकीचा वेध घेण्यासाठी स्थानिक श्री.शिवाजी महाविद्यालयात कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी बापुराव मडावी होते.गो.ग.पा.चे प्रदेश महासचिव अब्दुल जमीर अ. हमीद, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक तथा राजुरा विधानसभा कोअर कमिटी चे अध्यक्ष पांडूरंग जी जाधव, गोंडवाना गडकिल्ले संरक्षण समिती अध्यक्ष भिमराव पाटील जुमनाके,माजी सभापती भिमराव पाटील मेश्राम, जिवती तालुका अध्यक्ष ममताजी जाधव, राजुरा तालुका अध्यक्ष अरूण उदे, माजी सरपंच हनमंतू कुमरे,हिरापूर ग्रामपंचायत सरपंच सरपंच सुनीताताई तुमराम, ग्रामपंचायत सदस्य दुर्योधन सिडाम, पहांदीपारी कुपारलिंगो पेनठाणा अध्यक्ष लिंगाजी पाटील वेट्टी, कोरपना तालुका अध्यक्ष मेजर बंडूजी कुमरे, सुधाकर जी कुसराम, संजय सोयाम, लक्ष्मण चिकराम यांची प्रमुख उपस्थिती होती.
ते पुढे म्हणाले, गाळ्या सोबत नऱ्यांची यात्रा करणाऱ्यांनी पं.स.सदस्य, उपसभापती, जि.प.सदस्य पदे भुषविले पण सामाजिक योगदान नगण्य असल्याने कुणी विचारेना. आता राजकीय अस्तीत्व धोक्यात आल्याने त्यांची कोल्हे-कुई सुरू झाली आहे.त्यांची कोल्हेकुई म्हणजेच गोंडवाना चे यश आहे.अशा लाचारांच्या भुलथापांना बळी न पडता कार्यकर्त्यांनी आगामी निवडणुकी करीता सज्ज राहण्याचे आवाहन करण्यात आले. या वेळी जिल्हा बँकेचे संचालक पांडुरंग जाधव, प्रदेश महासचिव अब्दुल जमीर अ. हमीद, राजुरा तालुका अध्यक्ष अरूण उदे, यांनी आपले विचार मनोगतातून व्यक्त केले.
मेळाव्यात खालील प्रमाणे कोरपना तालुका पदाधिकारी निवड करण्यात आली. तालुका अध्यक्ष मेजर बंडूजी कुमरे, उपाध्यक्ष महादेव पाटील पेंदोर, सहसचिव छगन गेडाम, सोशल मिडिया प्रसिध्दी प्रमुख संकेत कुळमेथे, प्रदिप मडावी, युवा आघाडी अध्यक्ष मोहपतराव मडावी, उपाध्यक्ष सोमेश्वर कुमरे, धुरेश मडावी, सचिव रंजोश सिडाम, संघटक शांताराम कोडापे, सोशल मिडिया प्रमुख मंगेश पंधरे, हनमंतू बावणे, महिला आघाडी अध्यक्ष विमलबाई कुळमेथे, उपाध्यक्ष चंद्रकला मडावी, छायाताई या. कोडापे, सचिव निर्मला मरसकोल्हे, संघटिका रसिका वि. कोडापे, सिताबाई पंधरे यांची निवड करून नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आले. उर्वरित निवड पुढील बैठकीत करण्यात येईल.
मेळावा यशस्वी करण्यास प्रकाश शेडमाके, संदिप पंधरे, प्रविण मडचापे, विठ्ठल मडावी, लक्ष्मण कुळसंगे, दशरथ कन्नाके, संदीप मडावी यांनी परिश्रम घेतले.
प्रास्ताविक लक्ष्मण कुळसंगे यांनी तर संचालन व आभारप्रदर्शन संकेत कुळमेथे यांनी मानले.