सर सय्यद अहमद खान जयंती प्रित्यर्थ खवातीन-ए-इस्लाम तर्फे उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा सन्मान

0
578

सर सय्यद अहमद खान जयंती प्रित्यर्थ खवातीन-ए-इस्लाम तर्फे उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा सन्मान

 

कोरपना/प्रतिनिधी : १७ ऑक्टोंबर ला खवातीन-ए-इस्लाम या सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या महिला संघटने कडून चंद्रपूर येथे आधुनिक भारताच्या नवनिर्मितीत ज्यांचे महत्वपूर्ण योगदान राहिले. ज्यांनी मुस्लिम समाजाला शिक्षणाच्या माध्यमातून आधुनिकतेचा महामार्ग करून दिला. ज्यांनी AMU सारखी अतिशय महत्त्वपूर्ण विश्वविख्यात युनिव्हर्सिटी निर्माण करून दिली, असे थोर समाज सुधारक सर सय्यद अहमद खान यांची २०५ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवर व्यक्तींना सन्मानित करण्यात आले.

सदर कार्यक्रमात संस्थेच्या अध्यक्षा मोहतरमा शाहीन शेख यांनी यांच्या पावन स्मृतीस अभिवादन करून कार्यक्रमाची सुरुवात केली. या प्रसंगी उपस्थित वक्त्यांपैकी पंचाळा येथील जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक बाबुमियॉऺं शेख, शहीद टिपू सुलतान फाउंडेशन चे अध्यक्ष अमजद भाई, गडचांदूरचे ज्येष्ठ पत्रकार मोहमद रफिक शेख व संस्थेच्या अध्यक्षा मोहतरमा शाहीन शेख यांनी सर सय्यद अहमद खान यांच्या उल्लेखनीय शैक्षणिक व सामाजिक कार्यावर प्रकाश टाकला.

तसेच वक्त्यांनी खवातीन-ए-इस्लाम या महिला संघटनेने समाजात केलेले उल्लेखनीय कार्य, सामूहिक लग्न समारंभ, शैक्षणिक कार्यात पुढाकार घेवून पालकांची जनजागृती असो की गरीब होतकरू मुलांना मदत करण्याचे असो की सामाजिक व शैक्षणिक कार्यात महत्वपूर्ण कार्य करणाऱ्या व्यक्तींना सन्मानित करून त्यांना प्रोत्साहित करण्याचं कार्य असो… यात या संस्थेने अतिशय प्रशंसनीय कार्य केल्याबद्दल वक्त्यांनी खवातीन-ए-इस्लाम या महिला संघटनेची मुक्त कंठाने प्रशंसा केली. या कार्यक्रमात नुकतेच जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक बाबुमियाॅं शेख, ज्येष्ठ पत्रकार मोहोमद रफिक शेख, समाजसेवक अद्दील सिद्दीकी, मुसा शेख यांचा स्मृती चिन्ह देवून सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाच्या यशस्वीततेसाठी संस्थेच्या महिला सदस्यांनी अतिशय परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे संचालन मुसा शेख यांनी तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन फारुख भाई सिद्दीकी यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here