२६ वर्षीय युवकाने विवाहित महिलेला लग्नाचे आमिष दाखवून केले शारीरिक शोषण

0
852

२६ वर्षीय युवकाने विवाहित महिलेला लग्नाचे आमिष दाखवून केले शारीरिक शोषण

यवतमाळ, मनोज नवले
मारेगाव तालुक्यातील घटना सदर मारेगाव परिसरातील एका २८ वर्षांच्या महिलेला लग्नाचे आमिष दाखवून चार वर्षांपासून विवाहित महिलेवर नराधम सातत्याने र्लैंगिक शोषण व अत्याचार करत होता. याप्रकरणी पिडीत महिलेच्या तक्रारीवरुन सदर पोलिसांनी आपोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला. कुणाल दशरथ गोडे (२6) रा. अर्जुनी असे आरोपीचे नाव आहे.

पीडित महिलेचे लग्न २०११ मध्ये झाले होते. ती सध्या आपल्या मुलीसोबत मारेगाव शहरातील वार्ड क्र ३ मध्ये भाड्याने रूम करून राहत होती.२०१६ मध्ये कुणालची विवाहित महिलेशी ओळख झाली.व ती मुलीसोबत एकटी राहत असल्याचे कळल्यानंतर त्याने मैत्री वाढवण्यास सुरुवात केली. हळूहळू त्याचे या ना त्या बहाण्याने घरी येणे-जाणे सुरू केले व मैत्रिचे रूपांतर प्रेमात झाले त्यानंतर त्याने महिलेला लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले.

मात्र महिलेने लग्न करण्यासाठी दबाव टाकला; परंतु आरोपीने लग्नास नकार दिला. आरोपीने पीडित महिलेच्या मुलीला व महिलेला मारून टाकण्याची धमकी दिली. मात्र महिला प्रचंड घाबरली.हिम्मत न खचता पीडित महिलेने मारेगाव पोलीस स्टेशन गाठले आणि आरोपी विरुद्ध तक्रार दाखल केली. व मारेगाव पोलिसांनी आरोपी कुणाल गोडे विरुद्ध लैंगिक अत्याचारसह अनुसूचित जाती जमाती कलमांनुसार गुन्हा दाखल करून आरोपी कुणालला पोलिसांनी अटक केली असून पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी संजय पुज्जलवार व पोलीस निरीक्षक राजेश पुरी यांच्या मार्गदर्शनाखाली इकबाल शेख, आनंद अचलेवर, अजय वाभिटकर, रजनीकांत पाटील हे पुढील तपास करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here