पुरोगामी साहित्य संसद तथा पुरोगामी पत्रकार संघाची संयुक्त बैठक संपन्न

0
622

पुरोगामी साहित्य संसद तथा पुरोगामी पत्रकार संघाची संयुक्त बैठक संपन्न

 

चंद्रपूर, १८ ऑक्टो. : पुरोगामी साहित्य संसद तथा पुरोगामी पत्रकार संघाची संयुक्त बैठक काल चंद्रपूर येथे खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. या बैठकीत उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पदाधिकाऱ्यांना नियुक्त पत्र देण्यात आले.

सर्वानुमते २६ नोव्हेंम्बर ला संविधान दिनाच्या उपलक्षात कार्यक्रमाचे आयोजन २४ नोव्हेंम्बर ला आयोजित करण्याचे ठरविण्यात आले. यात जिल्हा स्तरीय विद्यार्थ्यांची कविता स्पर्धा तथा निमंत्रिकांचे कवी संमेलन आयोजित करण्याचे ठरविण्यात आले. तसेच यावेळी काही महत्वाचे निर्णय एकमताने घेण्यात आले.

या बैठकीत विदर्भ अध्यक्ष नरेंद्र सोनारकर, सल्लागार ऍड. राजेश सिंग, विदर्भ संघटक निलेश ठाकरे, जिल्हा प्रभारी सुजय वाघमारे यासह बैठकीला जिल्ह्यातील पुरोगामी पत्रकार संघाचे पदाधिकारी तसेच पुरोगामी साहित्य संघाचे पदाधिकारी उपस्थित होते. महिला पदाधिकारी ही या बैठकीला प्रामुख्याने उपस्थित होत्या हे विशेष…!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here