धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त रक्तदान शिबिर संपन्न
बौद्ध समाज युवा कमेटी व भिम आर्मी चा उपक्रम
राज जुनघरे
बल्लारपूर (चंद्रपूर) :– धम्मचक्र प्रवर्तन दिनाचे औचित्य साधून कोठारी येथील तरुणांनी स्वयंसेवी भावनेतून बौद्ध समाज युवा कमेटी व भिम आर्मी च्या वतीने बौद्ध विहार कोठारी येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा करण्याची अनुमती राज्य शासनाने नाकारली असली तरी कोठारी येथील युवा वर्गाने नाविन्यपूर्ण उपक्रम शिलता अंगीकारुन धम्म दिक्षांत सोहळा रक्तदान शिबिराचे माध्यमातून साजरा केला.
चंद्रपूर येथील सामान्य रुग्णालयाचे रक्तपेढी पथकातील संजय गावित, अपर्णा रामटेके, स्वस्तिक मुळे, रुपेश भुमे, चेतन वैरागडे यांच्या सहयोगाने व बौद्ध समाज युवा कमेटी आणि भिम आर्मी शाखा कोठारीचे युवा राहुल रामटेके, भिम आर्मी चे अध्यक्ष प्रमोद कातकर, सचिन रामटेके, ग्रा.प. सदस्य युवराज तोडे, कुलदिप खोब्रागडे, सिध्दांत तोडे, शुभम खोब्रागडे, भारत खोब्रागडे, अजय खोब्रागडे, नितिन देव, सुमित दुर्योधन, सचिन रायपुरे, राहुल वासंमवार, राहुल देठे, दिनेश पेलगुरवार, नितेश बुरेवार, मंगेश खोब्रागडे, अमोल कुळसंगे, कुणाल शंभरकर, सुमित उराडे, अखिल गेडाम, सम्यक पेटकर, निलेश खोब्रागडे आदी रक्तदात्यांच्या सहयोगाने रक्तदान शिबिर संपन्न झाले.