आदर्श बाल गणेश मंडळातर्फे सफाई कामगार महिला व पुरुष यांचा सत्कार
प्रवीण मेश्राम
आज सर्व भागात कोरोना या संसर्ग महामारी चालू असून या महामारी च्या काळात सफाई कामगार यांनी वेळोवेळी आपले कर्त्याव्या वर राहून सर्व जनतेची ते परिसर स्वच्छ ठेऊन सफाई करून रक्षा करतात. अशा महामारी त त्यांचे काम अत्यंत महत्वाचे मानले जातात यांचाच विचार करून आदर्श बाल गणेश मंडळांनी यांना त्यांचा सत्कार करून मंडळांनी व त्यांच्या प्रत्येक सभासदांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले.
या कार्यक्रमाचे मार्गदर्शक मनोज भाऊ भोजेकर.केशव डोहे.व त्यांच्या सर्व बाल गणेश मंडळाचे सदस्य यांनी योग्य रित्या त्यांनी ह्या कार्यक्रमात सहभागी होऊन सहकार्य केले. यात सर्व सफाई कामगार व महिला सफाई कामगार यांनी त्यांचे आभार व्यक्त केले.
चंद्रपूर जिल्ह्यातील औद्योगिक नगरी असलेल्या गडचांदूर येथील आदर्श बाल गणेश मंडळ हनुमान मंदिर वाड नंबर 3 प्रभाग क्रमांक पाच तर्फे यंदाचं वर्ष आरोग्य व उत्सव म्हणून साजरा करण्यात येत आहे आदर्श बाल गणेश मंडळातर्फे कोविड 19 योद्धा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आला यात गडचांदूर नगर परिषद गडचांदूर येथील महिला सफाई कामगार यांचा साठी साडी व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.व पुरुष सफाई कामगार यांना शर्ट आणि पुष्पगुच्छ देऊन यांना कोविड 19 योद्धा म्हणून यांचा सत्कार करण्यात आला .या मध्ये मनोज भोजेकर् . केसव डोहे .एम्पॅक्ट 24न्यूज प्रतिनिधी प्रवीण मेश्राम यांच्या हस्ते सफाई कामगार यांचा सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमात लाभलेले आदर्श बाल गणेश मंडळ हनुमान मंदिर वार्ड नंबर 3 मंडळाचे मार्गदर्शक धनंजय गोरे, रामदास सातपाडी, भाऊराव खामनकर, मनोज बोरकर, अनिल निवलकर , सुभाष गोरे, केशव डोहे, सुरेंद्र खामनकर, प्रेम कुमार मेश्राम, विनोद जेनेकर, व आदर्श बाल गणेश मंडळाचे सचिव राकेश भोजेकर, अध्यक्ष, शुभम खामनकर, उपाध्यक्ष दिनेश केळझरकर, कोषाध्यक्ष, अनुज खामनकर मंडळाचे सदस्य, गणेश केलझरकर , संतोष निवलकर, अमोल शास्त्रकर, आदित्य मेश्राम, संदीप बोरकर, माणिक डोहे, रमेश भोयर, ओमकार राखुंडे, उमेश भोजेकर, सचिन गोरे, सोपान खामकर इत्यादी उपस्थित होते.