चंद्रपूर येथे टिपूसुलतान फाऊंडेशन द्वारा स्कूल बॅग व वॉटर बॅग चे वितरण
भारतरत्न अब्दुल कलाम यांचा जन्म दीन उत्साहात साजरा
टीपु सुलतान फाऊंडेशन सामाजिक कार्यात अग्रेसर
नुकत्याच काही वर्षा पूर्वी स्थापन झालेल्या टिपू सुलतान फाऊंडेशन ने आपले जाळे संपूर्ण जील्ह्यात पसरवले असून नव नवीन सामाजिक उपक्रम घेऊन जनतेची सेवा करीत आहे.
नुकतेच फाऊंडेशन ने मुस्लिम गरीब मुलासाठी इजतेमाई खतना चा कार्यक्रम घेऊन 70 गरीब मुलाची खतना विनामूल्य करून दिली. व याचा लाभ कोरपना, गडचंदुर, राजुरा, जिवती, बल्लारपूर, वरोरा, भद्रावती व इतर चंद्रपूर जिल्ह्यातील मुस्लिम बाधवाणी घेतला असून येत्या फेबुरवारी मधे मोठ्या प्रमाणात कार्यक्रमाचे आयोजन करण्याचे फाऊंडेशन चे अध्यक्ष इंजी.अमजद शेख यांनी पत्रकाराला माहिती दिली.
सोबत आता माझी राष्ट्रपती ए.पी.जे अब्दुल कलाम साहेब याच्या जन्म दिनी गरीब मुलामुलींना स्कूल बॅग, वाटर बॅग चे वितरण केले यासाठी किदवई शाळेचे सय्यद हाजी हारून सर,भूषण फुसे, नूरुद्दीन सर व इंजि. अमजद शेख व फाऊंडेशन चे सर्व पदाधिकारी यांनी प्रयत्न केले. फाऊंडेशन ने सर्व समाज बांधवांचे आभार मानले.