लोकमान्य टिळक महाविद्यालयात सुप्रसिद्ध उद्योगपती महेश देशपांडे यांचे व्याख्यान आयोजित…

0
607

लोकमान्य टिळक महाविद्यालयात सुप्रसिद्ध उद्योगपती महेश देशपांडे यांचे व्याख्यान आयोजित…

 

वणी/यवतमाळ, मनोज नवले 

मूळचे वणीकर असणाऱ्या आणि आता जपान सारख्या प्रगत राष्ट्रात स्वत:ची पकड बसवित लोकप्रिय झालेल्या सुप्रसिद्ध उद्योगपती श्री महेश देशपांडे यांच्या वैशिष्ट्यपूर्ण अनुभवांचा लाभ विद्यार्थी वर्गाला व्हावा या दृष्टीने लोकमान्य टिळक महाविद्यालयात आयोजित सीनर्जी या कार्यक्रमात त्यांच्या ऑनलाईन व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.
ltm library wani या फेसबुक पेजवर लाइव्ह होणाऱ्या या उपक्रमाचा लाभ वणी परिसरातील सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी आणि वणीकर जनतेनी देखील घ्यावा असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.प्रसाद खानझोडे तथा उपक्रमाचे संयोजक डॉ. अभिजित अणे यांनी केले आहे.

नेमके कशासाठी ऐकायचे? महेश देशपांडे यांना……

* वणी सारख्या लहान गावातून आपण किती मोठे होणार? असा प्रश्न पडत असेल तर,
उत्तर म्हणून….
* आपल्या केवळ गुणवत्तेच्या भरवशावर वणी वरोरा नागपूर ते थेट जपान अशी झेप कशी घेता येईल ? हे समजून घेण्यासाठी…..
* नोकरी करण्यासाठी परदेशात अनेक जण जातात.
पण नोकरी सोबत इथे किती गोष्टी करता येतात? हे ऐकून थक्क होण्यासाठी……
* सातासमुद्रापार ओळखीचा कोणीही आजूबाजूला नसतांना अनोळखी प्रांतात अनोळखी भाषेसह स्वतःला कसे रूजवावे? हे जाणून घेण्यासाठी……
* ज्ञानाच्या आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून ” वसुधैव कुटुम्बकम् !” हे प्रत्यक्षात कसे आणता येते हे समजून घेण्यासाठी…….
* परदेशात गेलेली आणि माणसे स्वतः भरपूर पैसा कमावतात. तो कमवावा देखील.
पण त्यासोबत माणुसकी कशी जपता येते? याचे उदाहरण म्हणून……..
* त्या परदेशात आपल्या लोकांना कसे शोधायचे? त्यांच्यासोबत संपर्क कसे वाढवायचे? आणि तेथे आपली संस्कृती कशी मिरवायची? हे लक्षात घेण्यासाठी…..
* आपली स्वतःची उन्नती इतरांच्या विकासाची आधार कशी होईल? याचा वस्तुपाठ घेण्यासाठी….
* शेकडो मैलावर राहून सुद्धा आपल्या मातीशी कसे घट्ट जुळून राहावे? हे ध्यानात घेण्यासाठी…..

अशा कितीतरी गोष्टी आहेत. नव्हे खरेतर यापेक्षा अधिक खूप काही मिळेल….

Ltm library wani या फेसबुक चैनल वर रविवार दिनांक १७ ऑक्टोबर २०२१ रोजी सकाळी ठीक ११ वाजता निश्चितपणे सहभागी व्हा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here