डॉ. स्वानंद पुंड यांचे १६ ई बुक्स प्रकाशित

0
642

डॉ. स्वानंद पुंड यांचे १६ ई बुक्स प्रकाशित

 

 

वणी/यवतमाळ, मनोज नवले 

१ जानेवारी २०२० ते २४ जानेवारी २०२१ या कालावधीत दैनिक हिंदुस्थान मध्ये प्रकाशित विद्यावाचस्पती प्रा. स्वानंद गजानन पुंड यांच्या लेखणीतून साकारलेल्या श्रीशांकर स्तोत्र रसावली या तब्बल ३८१ लेखांच्या विक्रमी लेख मालिकेला रसिकांचा अभूतपूर्व प्रतिसाद लाभला होता.
प्रत्येक श्लोक आणि त्या श्लोकातील प्रत्येक शब्दाचे गूढार्थ उलगडून दाखविणारे नेमक्या शब्दातील विवेचन यामुळे ही लेख मालिका श्रोत्यांच्या सातत्यपूर्ण स्नेहाला पात्र ठरली होती.
“एकाच लेखकाचे, एकाच विषयाला धरून, एकाच वृत्तपत्रात, नियमित स्वरूपात प्रकाशित झालेले सर्वाधिक लेख” अशा स्वरूपात या लेखमालेची इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये विक्रम स्वरूपात नोंद झाली आहे हे विशेष उल्लेखनीय.
आता या सर्व लेखांचा आपल्याला कायमस्वरूपी आस्वाद घेण्याची एक सुवर्णसंधी प्राप्त झाली आहे.
मराठी वाचकाला शक्य त्या सर्व माध्यमातून नवनवीन पद्धतीने साहित्य उपलब्ध करून देण्यासाठी कटिबद्ध असणाऱ्या श्री निनाद प्रधान यांच्याद्वारे संचालित मराठीसृष्टी या वेब पोर्टलवर https://www.marathisrushti.com/ebooks-library/ आता ही संपूर्ण लेखमालिका क्रमाक्रमाने ई-बुक स्वरूपात उपलब्ध होत आहे.
या लेखमालिकेत प्रकाशित झालेले भगवान श्री गणेशां वरील ४ स्तोत्रांमधील २८ श्लोकांचे तथा श्री देवी पर १२ स्तोत्रांच्या १३० श्लोकांचे संपूर्ण निरूपण १६ ई-बुक स्वरूपात उपलब्ध झाले आहे.
त्याच प्रमाणे नजीकच्या भविष्यात या लेखमालेतील तील श्री शिव पर स्तोत्रे आणि श्री विष्णू पर स्तोत्रे यांचेदेखील प्रत्येक स्तोत्रावर एक या स्वरूपात विविध ई-बुक आपल्याला याच पोर्टलवर उपलब्ध होणार आहेत.
सध्या वाचकांना पूर्णत: नि:शुल्क स्वरूपात उपलब्ध असणाऱ्या या संधीची अनेक वाचकांनी मुक्तकंठाने प्रशंसा केली आहे.
समस्त भारतीय संस्कृती प्रेमीने, जगद्गुरु आदि शंकराचार्यांच्या स्तोत्रांचे आकर्षण असणाऱ्या प्रत्येकाने या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन मराठीसृष्टी यावे पोर्टलच्या द्वारे करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here