दालमिया सिमेंट कंपनी कामगारांच्या समस्या सोडवा
आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्याकडे कामगारांची मागणी
कोरपना, नितेश शेंडे : कोरपना तालुक्यातील नारंडा येथील दालमिया सिमेंट कंपनी मधील कामगारांच्या अनेक समस्या असून याबाबत भारतीय सिमेंट मजदूर संघातर्फे माजी वित्त मंत्री तथा लोखलेखा समितीचे अध्यक्ष आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी भेट घेऊन त्या सोडविण्याबाबत निवेदनाद्वारे मागणी केली.
दालमिया सिमेंट कंपनीला सुरू होऊन १ वर्ष होत तसेच कंपनीचे उत्पादनसुद्धा सुरू झालेले आहे परंतु अनेक समस्यांना कामगारांना तोंड द्यावे लागत आहे यामध्ये प्रामुख्याने मुरली सिमेंट मधील काही जुने कामगार व दालमिया सिमेंट मधील स्थानिक नवीन काही कामगारांना कंपनीमधून कमी करण्यात आलेले आहे त्यांना प्राधान्याने पूर्ववत कामावर घेण्यात यावे, पॅकिंग प्लांट मध्ये जुन्या कामगारांना पूर्ववत कामावर घेण्यात यावे, O&M मध्ये जुन्या स्थायी कामगारांना कामावर घेत असताना त्यांच्या जुन्या पदस्थापनेनुसारच कामावर घेण्यात यावे, तसेच सर्व कामगारांचे पगारवाढ करण्यात यावी, मायनींगमध्ये जुन्या सर्व कामगारांना पूर्ववत त्यांना नोकरी देण्यात यावी अश्या मागण्यांचे निवेदन आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांना सादर करण्यात आले.
यावेळी भाजयुमो जिल्हा उपाध्यक्ष आशिष ताजने, भारतीय सिमेंट मजदूर संघाचे सचिव रामरूप कश्यप, उपाध्यक्ष राजू गोहणे, महेश बिल्लोरिया, प्रवीण शेंडे, सुनील टोंगे, अजय खामनकर, मंगेश चांदेकर, अक्षय भोसकर, वैभव गाडगे, रवी शेंडे, डेबूजी मानापुरे, रवी शेंडे, पारस वाढई, लंकेश बोढे, कैलास बसेशंकर, छत्रपती मानकर, मोरेश्वर वडस्कर, किशोर बोपरे, संदीप रोगे, विकास भटारकर उपस्थित होते.