उद्या बिबी येथे ‘भव्य पुरुष मॅरेथॉन स्पर्धा‘
201 आदिवासी बंधूंना भूमिहीन प्रमाणपत्र मिळणार
प्रा. आशिष देरकर यांच्या वाढदिवसानिमित्य आयोजन
नांदाफाटा (कोरपना), नितेश शेंडे : जिल्हा स्मार्ट ग्रामपंचायत म्हणून जिल्हाभर प्रसिद्ध असलेल्या बिबीचे माजी उपसरपंच प्रा. आशिष देरकर यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने राष्ट्रसंत युवा मंडळ बिबी व प्रा. आशिष देरकर मित्रमंडळ बिबीच्या संयुक्त विद्यमानाने उद्या दिनांक 16 ऑक्टोबर ला बिबी येथे वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन केलं आहे. आयोजकांच्या वतीने भव्य पुरुष मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन केले आहे. मॅरेथॉन स्पर्धेत दोन गट असून गट ‘अ’ मध्ये 15 वर्षांवरील सर्व पुरुषांना सहभागी होता येईल व गट ‘ब’ मध्ये 15 वर्षांखालील विद्यार्थ्यांना सहभागी होता येईल. यामध्ये दोन्ही गटांकरिता प्रथम, द्वितीय, तृतीय पुरस्कार व सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र देण्यात येईल.
कार्यक्रमाच्या दुसऱ्या टप्प्यात सायंकाळी 4 वाजता 201 आदिवासी बंधूंना भूमिहीन प्रमाणपत्र वाटप करण्यात येईल. तसेच पोलीस भरतीसाठी परिश्रम करणाऱ्या युवकांसाठी ‘पोलीस भरतीपूर्व मार्गदर्शन’ होणार आहे. बिबी येथील नवीन जिल्हा परिषद शाळेमध्ये आर्या दि बेस्ट’ युनियन अकॅडमीचे संचालक भिमराव पवार यांच्याकडून पोलीस भरतीपूर्व मार्गदर्शन होणार आहे.
प्रा. आशिष देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त होणाऱ्या स्पर्धेत व कार्यक्रमात सर्वांनी सहभाग घ्यावा अशी विनंती कार्यक्रमाचे आयोजक राष्ट्रसंत युवा मंडळ बिबी व प्रा. आशिष देरकर मित्र मंडळाच्या सर्व सदस्यांनी केली आहे.