गट साधन केंद्र राजुरा येथे विशाल शेंडे यांचा सत्कार
राजुरा: तालुक्यातील जगतगुरु तुकोबाराय सार्वजनिक वाचनालय वरूर रोड येथे कोरोना महामारीच्या काळात स्वगावातील विद्यार्थ्याच्या शिक्षणात खंड पडू न देता,स्वयंप्रेरणेने शासनाच्या नियमांचे पालन करून विद्यादानाचे कार्य विशालने केले. याबद्दल गट साधन केंद्र राजुराच्या वतीने, गट साधन केंद्र,राजुरा येथे कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.विजय परचाके, गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती राजुरा, केवलराम डांगे, मुख्याध्यापक शिवाजी हायस्कूल राजुरा,श्रीराम मेश्राम,संजय हेडाऊ, मनोज गौरकार यांच्या उपस्थितीत प्रशस्तीपत्र, पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन विशाल शेंडे यांचा गौरव करण्यात आला.जगभरात कोरोना महामारीत शैक्षणिक कार्यात खंड पडला होता. शिक्षणापासून विद्यार्थी वंचित राहू नये, बाहेर भरकटत राहू नये,अभ्यासाची शिस्त कायम राहावी, शिक्षकांनी दिलेला ऑनलाईन गृहपाठ पूर्ण करता यावे यासाठी इंदिरा विद्यालय वरूर् रोड येथील शिक्षकांनी शिक्षक मित्राची जबाबदारी विशाल शेंडे याला दिली होती. ती जबाबदारी पूर्णत्वास नेऊन विशालने विद्यादानाचे महान असे कार्य केले. इतकेच नव्हे तर Covid-19 चे नियम पाळून विद्यार्थांसाठी अनेक सामाजिक, शैक्षणिक उपक्रम, कार्यक्रम राबविण्यात आले.व शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले. याच कार्याची दखल घेऊन विशालला गट साधन केंद्र रजुराच्या वतीने सन्मानित करण्यात आले. सदर कार्यक्रमात बहारदार सूत्रसंचालन मुसा शेख ,ज्योती गुरनुले साधनव्यक्ती यांनी केले तर आभार राकेश रामटेके यांनी मानले.