चंद्रपूर दिक्षाभूमी सोहळा बंदी तात्काळ उठवा अन्यथा लाखो अनुयायी दिक्षाभुमीवर धडकणार : दिपकभाई केदार

0
716

चंद्रपूर दिक्षाभूमी सोहळा बंदी तात्काळ उठवा अन्यथा लाखो अनुयायी दिक्षाभुमीवर धडकणार : दिपकभाई केदार

● ऑल इंडिया पँथर सेनेचे हल्ला बोल आंदोलन

● हल्ला बोल आंदोलनातून जिल्हाधिकाऱ्यांना इशारा

चंद्रपूर : नागपूर-चंद्रपूर दीक्षाभूमीवरील सोहळा बंदी हटवण्यासाठी, बौद्धविरोधी सरकार विरोधात ऑल इंडिया पँथर सेनेचे, चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यलयावर हल्लाबोल आंदोलन करण्यात आले.
कोरोनाच्या नावाखाली बौद्ध धार्मिक स्थळांवर सोहळा बंदी आणली गेली आहे. धम्मचक्र प्रवर्तन दिन आमच्यासाठी नव्या स्वातंत्राचा नवा जन्मदिन आहे. नागपूर दीक्षाभूमी, चंद्रपूर दीक्षाभूमी आमची अस्मितेचं प्रतीक आहे. दोन्ही जिल्ह्यात पुस्तक विक्री बंदी, प्रबोधन बंदी, अभिवादनासाठी डोस प्रमाणपत्राची अट घालून निर्बंध आणले आहेत.
याविरोधात बौद्धांमध्ये संताप आहे. आमच्या अस्मिताच्या प्रतिकांवरच कोरोना कसा काय येतो?
महाराष्ट्र बंद मध्ये सत्ताधारी पक्षाने हजारोच्या संख्येने रस्त्यावर उतरत आंदोलन केले तेंव्हा कोरोना कुठे होता? आताच तुळजापूरची यात्रा झाली तेंव्हा डोस प्रमाणपत्राची अट का घातली नाही? पंतप्रधानाच्या गुजरात राज्यात रात्रभर गरबा खेळला जात आहे तिथे कोरोना नाही का?
शिवसेना दसरा मेळावा साजरा करणार आहेत, मुख्यमंत्री त्या पक्षाचे आहेत. मुख्यमंत्र्यानी महाराष्ट्राला उत्तर द्यावं की ते डोस घेतलेल्याचं प्रवेश देणार आहेत का?
बौद्धविरोधी धोरणातून कटकारस्थान करून दीक्षाभूमी कैद करण्याचे काम सुरू आहे या चा आम्ही निषेध करतो. तात्काळ ही सोहळा बंदी हटवावी. दोन वर्षे झालं पुस्तक विक्रेते, आंबेडकरी साहित्य विक्रेते उद्धवस्त अवस्थेत आहेत. त्यांच्या पोटाचा प्रश्न उभा राहिलेला आहे. कोर्ट आणि आरोग्य मंत्री म्हणतात कोरोना प्रादुर्भाव नाही तेंव्हा हे तालिबानी फतवे काढून अस्मितेचे प्रतीक कैद का केले जातात.
यांच्या डोक्यात कोरोनाचा मूलव्याध उठलाय का? येईल त्याला अभिवादन करू द्या, रोखू नका, अभिवादन करणार म्हणजे करणार असा इशारा देण्यात आला.
यावेळी हजारो भिमअनुयायी महिला उपासिका सामील झाल्या होत्या. दीक्षाभूमी आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची या घोषणेनी परिसर दणाणून गेला होता.
ही बाब निंदनीय असून बौद्ध अनुयायांत संतापाची लाट पसरली आहे. त्यामुळे सामाजिक भावना लक्षात घेऊन धम्मचक्र अनुवर्तन सोहळ्यास घातलेली बंदी तात्काळ उठवावी याकरिता ऑल इंडिया पँथर सेनेच्या वतीने हल्ला बोल आंदोलन करण्यात आले. नवतरुणांना या सोहळ्याच्या माध्यमातून एक नवी उर्जा मिळते. त्यामुळे या सर्व बाबींचा विचार करून चंद्रपूर दिक्षाभूमी वर होणाऱ्या धम्मचक्र अनुवर्तन सोहळ्यास घातलेली बंदी तात्काळ उठवावी अन्यथा जिल्ह्यातील लाखो भिम सैनिकांना व बौद्ध अनुयायांना घेऊन ऑल इंडिया पँथर सेना दिक्षाभूमी वर बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करण्यास येईल असा इशारा जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून केला आहे.
निवेदन देतांना ऑल इंडिया पँथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष संघर्षनायक दिपकभाई केदार, महाराष्ट्र अध्यक्ष विनोद भोळे, चंद्रपूर जिल्हाध्यक्ष रुपेश निमसरकार, जिल्हा उपाध्यक्ष त्यागीभाई, जिल्हा युवा अध्यक्ष अजय झलके, जिल्हा सल्लागार संतोष डांगे, मार्गदर्शक सुरेश नारनवरे, भैय्याजी मानकर, सारीक उराडे, पपीता जुनघरे, सुमीत कांबळे, निशाल मेश्राम आदी पँथर कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here