विद्यापीठ स्तरीय संशोधन उद्योजकता स्पर्धेत चिंतामणी कॉलेजचे सुयश

0
657

विद्यापीठ स्तरीय संशोधन उद्योजकता स्पर्धेत चिंतामणी कॉलेजचे सुयश

 

गोंडपिपरी (सुरज माडुरवार)

गोंडवाना विद्यापीठाच्या 10 व्या वर्धापन दिनानिमित्त, इनोव्हेशन इनक्युबेशन आणि लिंकेज विभाग विद्यार्थ्यांमधील संशोधन आणि उद्योजकता शोधण्यासाठी नाविन्यपूर्ण विचार स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.
या कार्यक्रमात गोंडवाना विद्यापीठाच्या विविध महाविद्यालयांनी ३७ प्रस्ताव सादर केले. त्यापैकी २१ प्रकल्पांची लेव्हल २ साठी छाननी केली गेली जिथे पोस्टर आणि पॉवर पॉइंट प्रेझेंटेशनद्वारे त्यांच्या कल्पना मांडल्या गेल्या.
चिंतामणी कला आणि विज्ञान महाविद्यालय गोंडपिपरी कडून डॉ.जगदीश गभने, विभागप्रमुख, जीवरसायन श्यास्त्र यांच्या मार्गदर्शनाखाली ५ प्रस्ताव सादर करण्यात आले. पाचही जण दुसऱ्या फेरीसाठी निवडले गेले ज्यापैकी एका प्रस्तावाला पहिले बक्षीस मिळाले तर इतर चार जण प्रेरणादायी बक्षिसांसाठी निवडले गेले.
डॉ.जगदीश गभणे यांच्या मार्गदर्शनात साक्षी कवाडे हीने संपूर्ण विद्यापीठातून पहिले बक्षीस मिळवले.
निकिता बोमकंटीवार, रुतुजा चौधरी, वैष्णवी बांगरे तृतीय, ललित टेकाम याचा सहभाग होता.या यशाबद्दल चिंतामणी महाविद्यालयाचे सचिव स्वप्नील दोंतुलावर इतर सर्व पदाधिकारी, सर्व प्राध्यापक आणि प्राचार्य डॉ सीए निखाडे यांनी अभिनंदन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here