अवैद्य वाहतुक रोखण्या करिता आप चे वाहतूक बंद आंदोलन
वाहतूकिमुळे त्रस्त असलेल्या जनतेनी आंदोलन मध्ये शामिल होण्याचे आव्हान – अमित बोरकर
घुग्गुस शहर हे औद्योगिकरित्या खूप मोठ्या प्रमाणे व्यापला असून दिवसेंदिवस जड वाहतूक, अवैद्य वाहतूक वाढत आहे त्यात प्रदूषण ही एक मोठी समस्या समोर येत आहे. स्थानिक मोठ्या कम्पनी मध्ये ये जा करणारे ट्रक हायवा मुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही, शाळा सुरू झाल्या आहेत. विद्यार्थीयांना ट्रक हायवा मुळे धूळ आणि अपघाताशी सामना करावा लागत आहे म्हणून आम आदमी पार्टी घुग्गुस तर्फे पोलीस स्टेशनमध्ये अवैद्य वाहतूक बंद करण्याचे निवेदन देण्यात आले होते परंतु पोलीस अधिकारी यांनी या कडे लक्ष न देत जनतेला वाऱ्या वर सोडल्याचे दिसून येत आहे.
आम आदमी पार्टी घुग्गुस जनतेच्या जीवाशी खेळनाऱ्या कम्पनी आणि अवैद्य वाहतुक शहरा मधून बंद करण्याकरिता उद्या दिनांक 14 ऑक्टोबर 2021 रोजी वाहतुक बंद आंदोलन राजीव रतन चौक, रेल्वे फाटक समोर करणार आहे. या आंदोलनात सर्व जनतेनी सहभाग घ्यावा अशे आव्हान आम आदमी पार्टी घुग्गुस चे शहर अध्यक्ष अमित बोरकर यांनी केले आहे. आपल्याला आताच एवढा त्रास सोसावा लागत आहे भविष्यात असा त्रास होऊ नये म्हणून जनतेनी सहभाग घ्यावा अशी विनंती केली आहे.