वृक्षभेट- सांत्वन दिंडी
“स्मृतिशेष वृक्षस्मरण सांत्वन दिंडीअंतर्गत”, “थोडसं जगणं समाजासाठी” श्रीगुरुदेव उपक्रम राजुर इजारा व बोदाड येथे संपन्न
सम्राट अशोक बुद्ध विहार-राजुर इजारा येथे मृतकांना मौन श्रद्धांजली अर्पूण सांत्वन भेट
बोदाड(राजुर)येथे नवरात्री-निमित्य थोर मातृशक्तीस अाधार देवुन मृतांना भावपूर्ण अभिवादन
वृक्षदिंडीतर्फे बारा माता-भगिणींना साडीचोळी वृक्ष आणि ग्रंथभेट देवुन दिली उदार मातृशक्तिपीठास करुण ममत्वभेट
वणी/यवतमाळ, मनोज नवले
अखिल भारतीय श्रीगुरुदेव सेवा मंडळ तालुका कार्यकारिणी वणी,श्री गुरुदेव सेवा मंडळ तथा नवदुर्गोत्सव महिला मंडळ बोदाड, सम्राट अशोक बुद्ध विहार समिती राजुर इजारा, अ.भा.श्रीगुरुदेव सेवा मंडळ विठ्ठलवाडी, तथा समस्त श्रीगुरुदेव सेवा मंडळ वणी तालुका यांच्या सहकार्याने स्मृतिशेष वृक्षस्मरण सांत्वन दिंडी अंतर्गत “थोडसं जगणं समाजासाठी” श्रीगुरुदेव उपक्रम राजुर इजारा व बोदाड येथे नुकताच पार पाडण्यात आला.
यानिमित्ताने सर्वप्रथम सम्राट अशोक बुद्ध विहार राजुर इजारा येथे वृक्षदिंडिचे आगमन होताच विहार परिसराची स्वच्छता करुन दिंडिचे स्वागत करण्यात आले. कोविड काळात अनंतात विलीन झालेले बुद्धवासी.कन्हैयालाल बहादे, धनंजय बहादे,बाबाराव कांबळे स्व.दिनकर निंदेकर या दिवंगतांच्या प्रतिमेचे पुजन करुन भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्याचबरोबर या कोविडमृत कुटुंबातील महिलांना जि.प.सदस्य संघदीप भगत ग्रामपंचायतीच्या उपसरपंचा अश्विनीताई बलकी,विद्याताई जुनगरी, लताताई थेरे, रामकृष्ण ताजने (उपसेवाधिकारी), मनोहर झाडे, रुपालीताई पचारे, सरलाताई येलपुलवार यांच्या हस्ते साडीचोळी वृक्ष व ग्रंथभेट देवुन सांत्वन करण्यात आले. यावेळी विद्याताई जुनगरी यांनी उपस्थितांना ग्रामगीता व भगवान बुद्ध व त्यांचा धम्म हे ग्रंथ मानवाचे कल्याण करणारे ग्रंथ असल्याचे सांगितले.या कार्याचे सुत्रसंचालन गुणवंत पचारे यांनी केले.तर आभार बुद्धविहार कमेटीचे अनिल सातपुते यांनी केले.दिपाली सातपुते व समस्त महिलांनी व राजुर गावच्या सर्व गावकर्यांनी दिंडीचे धन्यवाद मानले.
नंतर दिंडीकडून बोदाड येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पुतळ्याला हारार्पण करुन नवदुर्गोत्सव महिला मंडळाच्या सौजन्याने वृक्षभेटीचा कार्यक्रम घेण्यात आला. याप्रसंगी कोरोनामुळे तथा संधिकाळात पंचतत्वात विलीन झालेले स्व.किसनराव राजुरकर, स्व.शंकरराव ऊईके, स्व.सुनिल जांभुळकर, स्व.गोविंदराव झाडे, स्व.सौ.इंदिराताई बबनराव झाडे या दिवंगतांच्या कुटूंबातील माताभगिणींना माता दुर्गा देवी समक्ष पाहुण्यांच्या हस्ते जशी मातेची खणानारळानी ओटी भरतात, तशी पाहुण्यांच्या हस्ते साडीचोळी, वृक्ष व ग्रंथभेट देवुन हतबल झालेल्या आईला आधार व बळ देवुन सांत्वन करण्यात आले.
या ठिकाणी गावचे मुळ रहिवाशी असलेले व सध्या वणी येथे राहत असलेले सेवामंडळाचे आदर्श प्रचारक मनोहर झाडे, विद्याताई जुनगरी, लताताई थेरे, रामकृष्ण ताजने, जि.प. सदस्य संघदीप भगत, ग्रा.प.सदस्या भारती जांभुळकर यांनी वृक्षभेटिचे महत्व व या संकटातून सावरण्याचे सामर्थ्य दिवंगतांच्या कुटूंबाला लाभावे, हि प्रार्थना मनोगतातुन व्यक्त केली.
या उपक्रमाचे संचालन मारोती आत्राम यांनी केले.तर आभार शोभा झाडे यांनी मानले. महिलांच्या आग्रहास्तव गुणवंत पचारे यांनी मातेचे एक गीत सादर केले. या कार्यासाठी ग्रा.पं. सदस्य रमेश आगुलवार, पोलीस पाटिल संजय पदलमवार तथा माजी पोलीस पाटिल दामोधर पदलमवार, वामन पंधरे,दिलीप जांभुळकर व कोरोनामृत झालेल्यांच्या सर्व कुटूंबियांनी या कार्याला शुभेच्छा देवुन कौतुक केले. यशासाठी किशोर भांदककर,बंडू झाडे व नवदुर्गोत्सव मंडळाच्या सर्व महिला, गुरुदेव सेवा मंडळ व समस्त ग्रामवासी यांचे मोलाचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाची सुरुवात संकल्पगीतानी तर समारोप राष्ट्रवंदनेने करण्यात आला.