
अखिल भारतीय समता सैनिक दल चंद्रपूर यांचा घोडपेठ येथे युवकांशी सवांद सभा संपन्न
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्वप्न डोळ्या समोर ठेऊन अ. भा. समता सैनिक दल चंद्रपूर चे सैनिक समता, स्वातंत्र्य व बंधुता हे विचार घरोघरी पोहोचवण्याच्या अनुषंगाने गाव तिथे शाखा, घर तिथे सैनिक ही संकल्पना घेऊन, काल दिनांक 11 ऑक्टोम्बर रोजी मु. पोस्ट घोडपेठ, तालुका भद्रावती, जिल्हा चंद्रपूर इथे अ. भा. समता सैनिक दल, जिल्हा चंद्रपूर ची गावातील युवकांशी संवाद सभा संपन्न झाली.
सदर कार्यक्रम अ. भा. स. सै. दल चे जिल्हा अध्यक्ष प्रणित भगत यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली असुन आयु. डॉ. प्रजेस घडसे, प्राविण्य पाथरडे, अनंत बावरे यांनी युवकांना मार्गदर्शन केले.

जो समाज आपला इतिहास विसरतो,तो समाज इतिहास घडवू शकत नाही. या डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारानुसार भारत देशातील नागवंशीय लोकांचा पराक्रमी इतिहास,सम्राट अशोक काळातील संपन्न असे धम्म शासन आणि नंतर च्या काळात या फोफावलेला जातीय अत्याचार या विषयी थोडक्यात माहिती सादर करण्यात आली.
आजच्या घडीला अ. भा. स. सै. दलाची आवश्यकता भारत देशातील विषमतावाद, जातीय मानसिकतेतून होणारे अत्याचार संपविण्यास किती आवश्यक आहे यावर प्रकाश टाकण्यात आला. अ. भा. समता सैनिक दलात सहभागी होऊन आपल्या देशात समता, स्वातंत्र्य आणि बंधुभाव निर्माण करून प्रगत अशा राष्ट्र निर्मितीच्या उदात्त कार्यात युवकांनी सहभागी व्हा असे आव्हान जिल्हा अध्यक्ष प्रणित भगत यांनी उपस्थित युवकांना केले.
सदर सभेचे नियोजन आणि सूत्र संचालन आयु. संदीप देठेकर, तर सभेचे प्रास्ताविक आयु. स्वप्नील लवादे आणि आभार प्रदर्शन आयु. विक्रम पाझारे यांनी केले. लवकरच घोडपेठ या गावात अ.भा.स.सै. दलाची शाखा उघडण्यात येईल असे सर्वानुमते ठरवण्यात आले.