रुग्णवाहिकेच्या अपघातात मृत पावलेल्या कुटुंबियांना आर्थिक मदत करून एका सदस्याला शासकीय सेवेत सामावून घ्या…!
बैलमपूर वासीयांची मागणी
राजुरा : काल दिनांक १० ऑक्टोबर रोजी राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार सुभाष धोटे यांना दिनांक ३०/९/२०२१ रोजी बैलमंपुर येथील लक्ष्मीकांत सुभाष तेलतुंबडे, कल्याणी सुभाष तेलतुंबडे यांचा गडचांदूर मार्गावरील हरदोना जवळ १०८ या रुग्णवाहिकेने झालेल्या अपघातातील मृत व्यक्तींच्या कुटुंबांना आर्थिक मदत व एका सदस्याला आरोग्य विभागातुन कायम स्वरूपी नौकरी देण्यात यावी यासाठी निवेदन देण्यात आले.
सुभाष तेलंतुमळे यांच्या परीवारात लक्ष्मीकांत हा एकटाच कमावता मुलगा होता त्याची अचानक पणे प्रकृती बिघडल्याने ग्रामीण रुग्णालय गडचांदूर येथे भरती करण्यात आले होते. पण त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने तेथील वैद्यकीय अधिकारी यांनी त्यांना चंद्रपूर येथील जिल्हा रुग्णालयात रेफर केले. १०८ या रुग्णवाहिकेने जात असताना रुग्णवाहिकेचा अपघात झाला. त्या अपघातात लक्ष्मीकांत सुभाष तेलतुंमळे व त्याची सोबत असणारी आई कल्याणी सुभाष तेलतुंमळे जागीच ठार झाले. त्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांवर घरातील कमावता मुलगा गेल्यामुळे व वडील अपंग व वृद्ध असल्याने त्याच्ंयावर उपवास मारीचि वेळ आली. त्या कुटुंबांना आर्थिक मदत मिळावी व कुटुंबातील एका सदस्याला आरोग्य विभागात कायमस्वरुपी नौकरी देण्यात यावी, यासाठी बैलमंपुर येथील नागरींकाचया वतीने व सामाजिक कार्यकर्ते दिपक मडावी यांच्या पुढाकाराने राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार सुभाष धोटे व तहसीलदार यांच्या तर्फे आरोग्य मंत्री राजेश टोपे साहेब यांना निवेदन देण्यात आले.
निवेदन देताना दिपक मडावी व पंचशील सिध्दार्थ बौद्ध मंडळ बैलमंपुर चे अध्यक्ष गुलाब मुरमाळे, सचिव राजु दुर्गे, सामाजिक कार्यकर्ते अशोक चादेंकर, आशावर्कर छायाताई जोगदंडे, हरी रामटेके, गुलाब मुरमाळे, सोनाली दुर्गे, चंद्रशेखर चादेंकर, बादल चादेंकर, शरद फुलझेले हे उपस्थित होते.