तंट्यातुन निर्माण झालेली चेक बोरगाव तंटामुक्त समिती ठरली अखेर अवैद्य
गौतम झाडे यांच्या मागणीला यश
गोंडपिपरी – दिनांक 15 सप्टेंबर 2019 ला बोरगाव ग्रामपंचायतीची ग्रामसभा घेऊन करण्यात आलेली तंटामुक्ती समितीची निवड शासकीय नियमांचे उल्लंघन करणारी असून या ग्रामसभेत तंटामुक्त समितीचे गठण करण्यात आले. ही ग्रामसभा सुद्धा covid-19 नियमाचे उल्लंघन करणारी होती. १/३ एवढेच पदाधिकारी बदलवता येतात. परंतु नियमांची पायमल्ली करत शासन निर्णय क्रमांक 2 चे उलंघन करून तंटामुक्त गाव समिती निवडण्यात आली. या संदर्भात काँग्रेस चे अनुसूचित जाती सेल चे तालुकाध्यक्ष माजी उपसरपंच गौतम झाडे यांनी सदर समिती अवैद्य ठरवा अशी मागणी केली होती. चौकशी करून सदर समिती अवैद्य ठरवण्यात आली. त्यामुळे नव्याने ग्रामसभा बोलावून संदर्भीय शासन क्रं 2 च्या अटी व शर्ती च्या अधीन राहून कोविड १९ च्या नियमांचे पालन करून नव्याने तंटामुक्त समिती गठीत करावी अशी सूचना गट विकास अधिकारी शेषराव भुलकुंडे यांनी पत्राद्वारे दिली आहे.