भेदोडा गावातील दौलत खेडेकर यांच्या शेतात सत्कार कार्यक्रम
राजुरा: तालुक्यातील भेदोडा या गावातील श्री दौलत खेडेकर यांच्या शेतात दि. ०६.१०.२०२१ ला कार्यक्रम घेण्यात आला. प्रवीण पचारे अजित Ach-155 सेल्स एक्झीकेटीव्ह चंद्रपूर यांनी शेताची पाहणी करून शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. याच दरम्यान दौलत खेडेकर या शेतकऱ्यांचा शाल, श्रीफळ, प्रमाणपत्र व छत्रपती शिवाजी महाराज यांचा फोटो देऊन सत्कार करण्यात आला.
दौलत खेडेकर हे शिक्षक असून शेती उत्तम प्रकारे करतात.त्यांनी शेतात जैविक शेतीचा अभिनव प्रयोग केला. अजित Ach- 155 या व्हेरायटी ला प्राध्यान्य दिले. पूर्वी कापूस व वेचण्यास चिकट होते. परंतु आज यांच्यात संशोधन करण्यात आले.असे पचारे यांनी भाषणात सांगितले.आजच्या स्थितीत १०० बोंड परिपक्व आणि पातळ सुरू आहे. या सिड्सला फळ फांद्या व बोंडाची शिरिज उत्तम आहे. हे शेतकऱ्यांनी प्रत्यक्ष येऊन बघितले. आज जैविक शेतीवर भर दिला पाहिजे. प्रत्येक शेतकऱ्यांनी रासायनिक खताचा अयोग्य वापर न करता जैविक खत व जैविक फवारणी तंत्रज्ञानाचा वापर करून जैविक शेतीचा अभिनव प्रयोग करून पर्यावरणाचा समतोल राखावा हा संदेश दौलत खेडेकर यांनी दिला. यावेळी भास्कर येमुलवार, बक्काजी टेकाम, शंकर गडमवार, लोखंडे, रमेश मुन,मनोहर राऊतवार आदि शेतकरी उपस्थित होते.