वरूर रोड येथील समिक्षा जीवतोडे वकृत्व स्पर्धेत ठरली द्वितीय
राजुरा: महाराष्ट्र शासन मध्य चांदा वनविभाग, चंद्रपूर वनपरिक्षेत्र राजुरा द्वारा वन्यजीव सप्ताह कार्यक्रम १ ऑक्टोंबर ते ७ ऑक्टोंबर या दरम्यान राबवित आहे. दिनांक ६-१०-२०२१ ला सकाळी १०.३० वाजता राजुरा वनपरिक्षेत्रातील कार्यक्षेत्रात असलेल्या शाळा, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकरीता “मानव वन्यजीव संघर्ष” या विषयावर वकृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. अनेक विद्यार्थी या वकृत्व स्पर्धेत सहभाग झालेले होते. शिवाजी हायस्कूल राजुरा येथे अठव्या वर्गात शिकत असलेली, जगतगुरु तुकोबाराय सार्वजनिक वाचनालय वरूर रोड येथील समीक्षा संतोष जिवतोडे या विद्यार्थिनीने वकृत्व स्पर्धेत हिरहीरीने सहभाग घेत द्वितीय क्रमांक प्राप्त केला. व आपल्या वाणीतून उपस्थित मान्यवरांचे मन जिंकून घेतले. या स्पर्धेचे बक्षीस वितरण कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.सुभाष धोटे, आमदार विधानसभा क्षेत्र राजुरा, नगराध्यक्ष अरुण धोटे राजुरा, सुनील देशपांडे फॉरेस्ट डिपार्टमेंट (CFF) मा.अरविंद मुंडे (भा.व.से) उपवनसंरक्षक, मध्य चांदा वनविभाग, चंद्रपूर, उपविभागीय वनपरिक्षेत्र अधिकारी अमोल गरकल यांच्या उपस्थितीत सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन समीक्षाला गौरविण्यात आले. या छोट्याश्या वयात अतिशय सुंदर असे भाषण केल्यामुळे मा.आमदार सुभाष धोटे व उपस्थित मान्यवरांनी समिक्षाचे खूप कौतुक केले.समिक्षाने अनेक स्पर्धा जिंकल्या व अनेक क्षेत्रात आपले नावलोकिक केले आहे. या स्पर्धेसाठी विशाल शेंडे या युवकाचे समिक्षाला मोलाचे मार्गदर्शन लाभले होते. सदर कार्यक्रमाला परीक्षक म्हणून शिक्षक स्वतंत्रकुमार शुक्ला आणि मेघा धोटे होत्या. या यशाबद्दल शाळेतील शिक्षकवृंद, मित्र परिवार, आई-वडील यांनी समिक्षाचे कौतुक केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.