सोनापूर येथे पशू उपचार व वंध्यत्व उपचार शिबिर आयोजित
चामोर्शी/गडचिरोली, सुखसागर झाडे
पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पशुवर चौकुरा, मोहळ सारखी साथ तसेच विविध रोगाची लागन होत असते. जनावरांना अनेक आजार होतात, त्यामुळे अनेक पशूंचे आरोग्य धोक्यात येत असतात.त्यासाठी सोनापूर येथे पशू उपचार व व्यंधत्व उपचार शिबिर आयोजित करून गावातील शेतकरी, पशु पालकांच्या शेळ्या, म्हैस, बैलावर पशु उपचार 148, वधत्व 9, गर्भतपासनी 15, जतंनिर्मलन 44, जवळपास पशुंवर उपचार करण्यात आले. यावेळी शेषराव कोहळे उपसरपंच, यांच्या उपस्थितीत, डॉ.देवकुळे साहेब यांचे मार्गदर्शनाखाली, डॉ लोखंडे सर, पशुधन पर्यवेक्षक महेश पुठावार, अमरदिप ठेमसकर, सुकदेव गेडाम, आकाश खेडकर, प्रितम गेडाम आदी पशु वैद्यकीय दवाखाना चामोर्शी येथील टिम उपस्थित राहून उपचार व मार्गदर्शन केले, गावातील मोठ्या प्रमाणावर शेतकरी बांधवांनी उपस्थित राहून आपल्या जनावरांना उपचार करून घेतला.