आप च्या जनता समस्यानिवारण कार्यालयाचे प्रथमदर्शनी बॅनर अज्ञातांकडून मध्यरात्री फाडले
आम आदमी पक्षाचे युवा जिल्हाध्यक्ष मयूर राईकवार यांनी नुकतेच काही दिवसापूर्वी जनतेच्या समस्यांची सोडवणुक करण्याकरिता नागपूर रोडवरील त्यांच्या निवासस्थानी जनता समस्या निवारण कार्यालय सुरू केले होते .
या कार्यालयाच्या माध्यमातून परिसरातील व जिल्ह्यातील अनेक नागरिक त्यांच्या कार्यालयात आपल्या समस्या घेऊन येत होते . तिथे जाऊन युवा जिल्हाध्यक्ष मयूर राईकवार हे त्यांच्या समस्यांचे निराकरण करून देण्याचा प्रयत्न करीत होते .अनेकांचे त्यात हॉस्पिटलमधील प्रश्न ,पोलीस स्टेशनच्या समस्या, महानगरपालिकेतील समस्या जिल्हाधिकारी कार्यालयातील समस्या घेऊन नागरिक त्यांच्या कार्यालयात भेट देत होते. त्यामुळे लोकांमध्ये आम आदमी पक्षाची लोकप्रियता वाढू लागली होती मयूर राईकवार हे त्यांच्या प्रभागातील मजबूत दावेदार आहेत. त्यांच्या लोकांमधे मीसळून काम करूण देण्याच्या शैली मुळे त्यांची लोकप्रियता वाढत आहे. पण हीच लोकप्रियता विरोधकांना खटकत आहे. म्हणून त्यांनी मध्यरात्री काही समाजकंटकांकडून कार्यालया समोरील प्रमुख बॅनर फाडले.
घडलेल्या घटनेमुळे आम आदमी पक्षाने सोशल मीडीया वर तीव्र नाराजी व्यक्त करत जिल्हाध्यक्ष सुनिल मुसळे यानी म्हटले आहे की बॅनर फाडुन विरोधी पक्षाने आम्हाला आमच्या कामाचे प्रमाणपत्र दिले आहे. मयूर राईकवार यांनी त्या घटनेवर बोलत बॅनर फाडण्याची सुपारी देणाऱ्या लोकांना असा संदेश दिला आहे की वार करायचा असल्यास छातीवर करा मागे करू नका आम्ही एका क्रांतिकारी पक्षाचे कार्यकर्ते आहोत म्हणून आम्ही कुणाला घाबरत नाही बॅनर फाडून तुम्ही जनतेच्या कार्यालयाचे नुकसान केले आहे ज्या कार्यालयातून नागरीकांना सहकार्य व त्यांच्या समस्या सुटत होत्या ते कार्यालय तुम्ही बंद करण्याचा प्रयत्न केला आहे आणि ज्या लोकांनी बॅनर फाडले त्यांना मी एकच बोलतो की तुमच्या ही कुठल्या समस्या असतील तर तुम्ही आमच्या कार्यालयात खुशाल या आम्ही तुमच्या समस्या सोडवू आम आदमी पक्ष हा सुड बुद्बधीने बदला घेण्याच्या भावनेने बनलेला पक्ष नाही म्हणून आम्ही बदला घेण्याची भाषा न करता वैचारीक बांधिलकीने समोर या असे आवाहन आम आदमी पार्टी ने केले आहे.