धार्मिक स्थळे सुरू झाल्याशिवाय चूप बसणार नाही .. आमदार बंटीभाऊ भांगडीया
चिमूर येथील घंटानाद आंदोलन
चिमूर तालुका प्रतिनिधी
राज्यभर मंदिर सुरू करण्यासाठी घंटानाद आंदोलन करणे ही खेदाची बाब असून राज्यातील धार्मिक स्थळ बंद केले. बस ने वाहतूक केल्यास ई पास ची गरज नाही तर खाजगी बस साठी ई पास आवश्यक कशी ?असे भेदभाव चे महाराष्ट्र विकास आघाडी चुकीचे निर्णय घेतलेले आहे .धार्मिक स्थळ वर श्रद्धा ठेवली जात असताना संकटावर मात करण्यासाठी परमेश्वर श्रद्धा ठेवली जाते. मग धार्मिक स्थळ वर बंदी का ठेवली ? जिल्हातील पालकम मंत्री यांनी दारू उठविण्यासाठी पत्र देता तर धार्मिक स्थळ वरील बंदी उठविण्यासाठी व चिमूर ची पाणी पुरवठा योजना चालू करण्यासाठी पत्र का दिला नाही असा सवाल आमदार बंटीभाऊ भांगडीया यांनी करीत राज्य सरकारने नियम घेत असताना राज्यातील धार्मिक स्थळे बंदी उठविण्यासाठी आम्ही चूप बसणार नसल्याचा इशारा आमदार बंटीभाऊ भांगडीया यांनी दिला
श्रीहरी बालाजी मंदिर च्या प्रांगणात दार उघड उद्धवा दार उघड या घंटानाद आंदोलनात आमदार बंटीभाऊ भांगडीया बोलत होते .
भाजप प्रदेश सदस्य वसंत वारजुकर ,डॉ श्यामजी हटवादे ,निलम राचलवार ,बकारामजी मालोदे, डॉ दीपक यावले , प्रकाश वाकडे ,प्रकाश बोकारे ,सुरज नरुले ,किशोर मुंगले ,प्रफुल कोलते ,राजू बानकर , प्रशांत चिडे, समीर राचलवार, योगेश नाकाडे ,ओमप्रकाश गणोरकर ,प्रवीण गणोरकर डॉ देवनाथ गंधारे, विलास कोराम ,संदीप पिसे ,विजय झाडे ,मनिष नाईक ,राजू बोडणे ,लीलाधर बनसोड, कलिम शेख ,गजानन गुळध्ये ,नगरसेवक सतीश जाधव, अफरोज पठाण ,गीता लिंगायत, माया ननावरे , ज्योती ठाकरे, आशा मेश्राम ,मनीषा कावरे, ललिता चौधरी , रत्नमाला मेश्राम बोरतवारताई आदी उपस्थित होते
संचालन राजू देवतळे यांनी केले .
तालुक्यातील भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते
दरम्यान भाजपचे वतीने आमदार बंटीभाऊ भांगडीया यांच्या नेतृत्वाखाली घंटानाद आंदोलन करण्यात येऊन मुख्यमंत्री यांना उपविभागीय अधिकारी मार्फत निवेदन देण्यात आले .