वणी शहर काँग्रेस तर्फे प्रियंका गांधी यांना अटक केल्या बाबत जाहीर निषेध
वणी/यवतमाळ, मनोज नवले
खिरी या गावात शेतकऱ्यांचा नरसंहार करून प्रियंका गांधी यांना अटक करून नजर कैदेत ठेवण्यात आले.भारतात लोकशाही असतांना हुकुमशाही करणारे उत्तर प्रदेश मधील योगी आदित्यनाथ भाजप सरकार बरखास्त करण्यात यावे व लखीमपुर खीरी गावात हिंसाचार करणाऱ्यांची चौकशी करून कठोर शासन करण्यांत यावे.याबाबतचे निवेदन वणी शहर काँग्रेस कमिटीने उपविभागीय अधिकारी डॉ. शरद जावळे यांचे मार्फत राष्ट्रपती भारत सरकार याना पाठविण्यात आले आहे.वणी येथील डॉ. आंबेडकर व शिवाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळ्याला हारार्पण करून शहरातील 2 चौकात रॅली काढण्यात आली व योगीनाथ सरकारने जे कृत्य केले त्याचा जाहीर निषेध करीत नारेबाजी देखील वणी शहरात करण्यात आली उत्तर प्रदेश लखीमपुर खीरी या ठिकाणी शेतकऱ्याचे आंदोलन सुरु असतांना उत्तर प्रदेशातील योगी आदित्यनाथ भाजप सरकारनी लखीमपुर खीरी येथील शेतकऱ्यांना गाडीखाली चिरडून नरसंहार घडवून आणला. देशातील शेतकऱ्यांना उद्धवस्त करण्याचे धोरणच भारतीय जनता पक्षाचे सरकारने आखले असुन शेतकरी संपविण्याचे पाप हे सरकार करीत आहे. व काँग्रेस नेत्या सरचिटणीस प्रियंका गांधी लखीमपूर खीरी येथील पिडीत शेतकरी कुटुंबाला भेटण्यासाठी जात असतांना त्यांची अडवणूक केली. त्यांच्याशी पोलीसांनी गैरवर्तन केले आणि बेकायदेशीर अटक केली.भारतात लोकशाही असतांना हुकुमशाही करणारे उत्तर प्रदेश मधील योगी आदित्यनाथ भाजप सरकार बरखास्त करण्यात यावे व लखीमपुर खीरी गावात हिंसाचार करणाऱ्यांची चौकशी करून कठोर शासन करण्यांत यावे. या घटनेचा वणी शहर काँग्रेस व तालुका काँग्रेस, सेवादल काँग्रेस युवक काँग्रेसच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला आहे. यावेळी संबंधित निवेदनाच्या प्रति नानभाऊ पटोले, बाळू धानोरकर (खासदार) यांनाही पाठविण्यात आले .यावेळी उपस्थित प्रमोद निकुरे,संतोष पारखी, राजाभाऊ, इजहार शेख, प्रमोद वासेकर, प्रमोद लोणारे, अभिजित सोनटक्के ,विकेश पानघाटे, सुधीर खंडाळकर, गुलाम रंगरेज ,अल्ताफ रंगरेज, सुमित ठाकरे ,कैलास पचारे,महेश मांढरे, महादेव दोडके,रोहन पिंपडशेंडे,लक्ष्मण पोंनलवार ,प्रदिप खेकाडे अक्षय धावणजेवार ,विजय मोरे व अन्य शहरातील युवकही होते