‘नगरपंचायतीचा प्रताप’ वैशिष्ट्यपूर्ण निधीची कामे गायब
चौकशी समिती नेमण्याची नगरसेवक सुहेल अली यांची मागणी
कोरपना (ता. प्र.) : चंद्रपूर जिल्ह्यातील नव्याने स्थापन झालेल्या नगरपंचायतीच्या विकास कामासाठी म्हणून सन 2018 19 वित्तीय वर्षात वैशिष्टपूर्ण दोन कोटीचा निधी शासनाने तत्कालीन पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार आमदार संजय धोटे यांनी कोरपना नगरपंचायत हद्दीतील 1 ते 17 वार्डातील तेरा कामाकरिता एक कोटी 93 लाख रुपयाचा निधी उपलब्ध करून दिला दिनांक 31 ऑगस्ट 2017 ला महाराष्ट्र शासनाच्या पत्रानुसार अटी व शर्ती अधीन राहून मान्यता देण्यात आली होती 27 मार्च 2018 च्या निधी वितरणात आदेशांमध्ये टाकून दिलेल्या अटी व शर्ती भंग झाले यामध्ये तेरा कामासाठी 1 ते 17 वार्डातील कामासाठी मार्च 2018 मध्ये तांत्रिक व प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती सदर सदर कामाची अंदाजपत्रक किंमत १.५९.६६४.६२ रू ३१ ऑगस्ट २०२१ अखेर १,४७.८३७ ३२निधि खर्च केला व कंत्रटदाराने उचल केला वैशिष्टपूर्ण निधीतील 27 मार्च 2018 च्या कामाच्या यादीतील वार्ड क्रमांक दोन येथील पंधरा लाखाचा सिमेंट काँक्रीट रस्ता तसेच वार्ड नंबर चार येथील 28 लाखाचा सिमेंट काँक्रीट रस्ता विसावा रंगमंच तसेच वार्ड नंबर 16 येथील बळवंत ठाकूर डॉक्टर रणदिवे यांच्या घरापर्यंत नालि व सिमेंट काँक्रीट रस्ता अशी 50 लाखाची कामे झाली नसताना वार्ड नं एक व वार्ड नंबर 2 येथील बाल उद्यान खेळणी साहित्य विसावा ही कामे ठप्प असून ई निविदा प्रक्रिया मध्ये घोळ असून ठराविक संगणमत करून तीनच लोकांचे निविदा सादर केले जाते रिंग पद्धतीने हे तीनच ठेकेदार कोरपणा येथे निविदा टाकतात पूर्ण स्पर्धात्मक निविदा काढल्या जात नाही कोरपणा येथील पाच वर्षात भूषण इटनकर नावाच्या एकाच व्यक्तीला मोठ्या प्रमाणात कामे देण्यामागे भ्रष्टाचार नियमाची पायमल्ली केल्या गेले आहे अनेक कामे निकृष्ट मंजूर ठिकाणी बांधकाम करण्यात आलेले नाही एकच कामे दोन ठिकाणी दाखवण्यात आले मुख्याधिकारी यांनी दिनांक 10. 9. 2020 ला न्यायालयात प्रकरण असताना व न्यायलयाचे व नगरपंचायतीचे कोणतेही आदेश नसताना कंत्राटदारांनी काम सुरू केल्याच्या तक्रारी झाल्या होत्या मुख्याधिकारी यांनी तात्काळ काम बंद करून देयके देण्यास नगरपंचायत जबाबदार राहणार नाही असे कळविले होते असे असताना जे काम नगरपंचायतीच्या निधीतून खर्च झालेच नाही व सार्वजनिक बांधकाम विभागाने जे काम केलेमग त्याची मोजमाप पुस्तिकेमध्ये नोंद कशी घेण्यात आली व जे काम दुसऱ्या विभागाकडून झाले असताना मुख्यधिकाऱ्याने ते काम वैशिष्ठ पुर्ण निधितुन प्रस्तावित का केले या कामाचे अंदाजपत्रक प्रशासकीय मान्यता व शासनाच्या निर्देशानुसार झालेच नसताना अंदाजपत्रक व मोजमाप पुस्तिकेमध्ये मोठी तफावत असून संपूर्ण जिल्ह्यामध्ये रेती बंद असताना कंत्राटदाराने वाळूचा वापर केलाच नाही असे असताना विना वाळूचे दगडी डस्ट चुरीवापर करण्यात आला. अनेक कामे निकृष्ट झाल्याच्या अनेक तक्रारी होऊनसुद्धा चौकशी न करता कंत्राटदाराला निधी देण्यात आली यामध्ये मोठा गैरव्यवहार असून अनेक कामे शासनाच्या नियम निकष व करार नामा प्रमाणे करण्यात आलेले नाही कार्यरंभ आदेश नुसार ठराविक कालावधित कामे झाली नाही शासनास उपयोगिता प्रमाणपत्र देताना नियमाचे उलंघन करण्यात आले नगरपंचायत क्षेत्रातील मंजूर कामाच्या यादी पैकी चार कामे झालीच नाही बाल उद्यान व ज्येष्ठ नागरिक विसावा रंगमंच मंडप इत्यादी कामे झाली नसताना एक कोटी 59 लक्ष रुपये मंजूर कामापैकी एक कोटी 48 लाख खर्च झाला 50 लाखाची सिमेंट काँक्रेट रस्त्याची कामे चोरीला गेली काय असा सवाल नागरिक करू लागले असून राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष सोहेल आबिद अली यांनी विषेश चौकशी समिती नियुक्त करूण चौकशीची मागणी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनातुन केली आहे भाजपचे अमोल आसेकर स्वाभिमान पार्टीचे मोहब्बत खान शेतकरी संघटनेचे सुभाष तुरणकर सुनिल देरकर इत्यादीनी सन २0१६ ते २०२१पर्यंत नगरपंचायतीच्या विकास कामात अनियमीतता गैरव्यवहार व निकृष्ठ कामाची निपक्षपात पणे चौकशी करावी व कंत्रटदार भुषण इटनकर यांनाच मोठया प्रमाणात कामे देण्याचे व शासन धोरणाची अमलबजावणी कडे नगरपंचायत कानडोळा का केला या मागील उद्देशाचा पर्दाफाश करावा अन्यथा भष्ट्राचार गैरव्यवहार विरोधात आंदोलन छेडण्याचा इशारा निवेदनातुन दिला आहे.