हक्क, अधिकारासाठी समाजाने एकत्र यावे – राजेश डोडीवार
राज जुनघरे
बल्लारपूर (चंद्रपूर) : अखिल भारतीय मादगी समाज संघटना चंद्रपूर जिल्हा तर्फे बल्लारपूर तालुक्यातील कळमना येथे समाज बांधवांची बैठक घेऊन कार्यकारिणी गठीत करण्यात आली. सदर बैठकीत अध्यक्ष म्हणून मा. राजेश डोडीवार विदर्भ अध्यक्ष तथा उपसरपंच ग्रामपंचायत कुडेसावली होते. राजेश डोडीवार यांनी संघटनेचे महत्व पटवून देताना म्हणाले कि… समाजाला एकत्र येऊन आपले हक्क व अधिकार हिरावून घेण्यासाठी आपल्याला संघटीत होणे गरजेचे आहे. आपले मुले मुली शिक्षण घेऊन आपला विकास करण्यासाठी शैक्षणिक मार्गदर्शन शिबिरे लावणे गरजेचे आहे. व्यवसायिक शिबिरे लावून उद्योजक निर्माण करणे काळाची गरज आहे. तसेच समाज आपल्या जीवनात यशस्वी कसा होईल या संदर्भात सुद्दा वेळोवेळी समाज प्रबोधने लावून प्रत्येक समाजबांधव आपल्या समस्या सोडविण्यासाठी सक्षम करणे संघटनेचे मुख्य उद्धेश राहील. असे आपल्या मार्गदर्शनातून सांगितले. प्रमुख उपस्थिती म्हणून शंकर पेगडपल्लीवार जिल्हाध्यक्ष चंद्रपूर , बुद्धेश्वर गोरडवार सहसचिव तालुका कोरपना हे प्रामुख्याने उपस्थित होते. बैठकी मध्ये कळमना गावाचे अध्यक्ष म्हणून दिवाकर शंकर कमलवार यांची नियुक्ती झाली. तसेच राजू रेनकुंटलवार उपाध्यक्ष, संघर्ष रेनकुंटलवार सचिव , रामचंद्रजी कमलवार सल्लागार, प्रमोद रेनकुंटलवार, सहसचिव , तुळशीराम कमलवार, कोषाध्यक्ष, समय्या तग्रपवार सहकोषाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. सदर कार्यक्रमामध्ये समाज बांधव मोठ्या संख्येनी उपस्थित होते. नवनिर्वाचित अध्यक्ष यांनी निवड झाल्यानंतर आपले मनोगत व्यक्त करताना म्हटले कि आपल्या समाजातील शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक मागासलेला असून मागासलेपण दूर करण्यासाठी सर्व कार्यकारिणीला व समाज बांधवाना सोबत घेऊन प्रामाणिक प्रयन्त करेन असे आश्वसन दिले. सूत्रसंचालन जिल्हाध्यक्ष शंकर पेगडपल्लीवार यांनी केले. तर आभार संघर्ष रेनकुंटलवार सदस्य ग्रामपंचात कळमना यांनी केले. मिटिंग ला येकांजी कंबलवार, नावदेव कंबलवार, पंकज कंबलवार, आनंद रेनकुंटलवार, रेखा आनंद रेनकुंटलवार, सुजाता विशाल कंबलवार, दिव्या दिवाकर कंबलवार व इतर समाज बांधव, युवक व महिला उपस्थित होते.