कारला ग्रामपंचायतीचा वीज पुरवठा अखेर बंद…!
अमरावती, देवेंद्र भोंडे
चांदूर रेल्वे (अमरावती) : चांदूररेल्वे तालुक्यातील सर्वात गरीब ग्रामपंचायत म्हणून ओळखल्या जाणार्या कारला ग्रामपंचायतीच्या पाणी पुरवठा योजनेला लागणारा वीज पुरवठा वीज वितरण कंपनीने थकीत बिल न भरल्याने शनिवारी खंडित केला आहे.
यामुळे गावाचा पाणी पुरवठा बंद होऊन नागरिकांचे हाल होत आहेत.
अशा सक्षम असलेल्या ग्रामपंचायतीकडे हे थकीत बील वेळेत न भरल्याने अखेर महावितरणने वीज पुरवठा खंडित करण्याची कारवाई केली.
अचानक सकाळपासून वीज पुरवठा खंडित झाल्याने नागरिकांना पिण्याच्या पाण्याची कमतरता भासून हाल झाले. कारला ग्रामपंचायतीकडे गेल्या अनेक वर्षांपासून ही थकबाकी असून, एक रकमी पूर्ण रक्कम ग्रामपंचायतीने भरलेले नाही.