लोकमान्य टिळक महाविद्यालयात दीक्षारंभ उपक्रम संपन्न…
वणी/यवतमाळ, मनोज नवले
महाविद्यालयात प्रवेश घेणाऱ्या सर्व नवीन विद्यार्थ्यांना आपल्या महाविद्यालयाचे उज्ज्वल परंपरा माहिती असावी त्याच प्रमाणे महाविद्यालयात यांना कोणकोणत्या सुविधा उपलब्ध आहेत याबाबत त्यांना सविस्तर माहिती मिळावी आणि त्यादृष्टीने त्यांना आपल्या महाविद्यालयातील भावी काळाची आखणी करता यावी या हेतूने लोकमान्य टिळक महाविद्यालयात दिनांक २७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२१ या काळात दीक्षारंभ उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.
यात पहिल्या दिवशी या उपक्रमाचे संयोजक डॉ. करम सिंग राजपूत यांनी महाविद्यालयात काम करणाऱ्या प्रत्येक प्राध्यापकांच्या कार्याचा परिचय विद्यार्थ्यांना करून देत महाविद्यालयात शैक्षणिक दृष्ट्या उपलब्ध असलेल्या सुविधांचा आढावा घेतला.
प्रथम दिवशी उद्घाटन कार्यक्रमात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रसाद खानझोडे यांनी महाविद्यालयात उपलब्ध विविध सुविधा आणि विद्यार्थ्यांकडून महाविद्यालयाच्या असणाऱ्या अपेक्षा विशद केल्या.
दुसऱ्या दिवशी सांस्कृतिक उपक्रम आणि विद्यार्थी विकास या विषयावर बोलतांना डॉ. अभिजित अणे यांनी या क्षेत्रातील या पूर्वीचे विद्यार्थ्यांचे योगदान स्पष्ट करीत महाविद्यालयात तथा विद्यापीठ स्तरावर आयोजित होणाऱ्या विविध सांस्कृतिक उपक्रमांची माहिती दिली.
तिसऱ्या दिवशी माध्यमांसाठी लेखन आणि व्यक्तिमत्व विकास या विषयावर बोलताना डॉ. अजय देशपांडे या विषयाच्या विविध पैलूंना उलगडून दाखविणे.
चौथ्या दिवशी डॉ. रवींद्र मते यांनी राष्ट्रीय छात्र सेना, डॉ. नीलिमा दवणे यांनी राष्ट्रीय सेवा योजना, प्रा.उमेश व्यास यांनी क्रीडा विभाग तर डॉ गुलशन कुथे यांनी महाविद्यालयाच्या संपन्न ग्रंथालयात चालणाऱ्या विविध उपक्रमांची आणि उपलब्ध सुविधांची माहिती दिली. पाचव्या दिवशी डॉ. गजानन अधळते यांनी विद्यार्थी जीवनात योगाचे महत्व या विषयावर उद्बोधन केले.
समारोपाच्या सहाव्या दिवशी खामगाव येथील जीएस महाविद्यालयात सेवारत डॉ. आनंद भोसले यांनी व्यक्तिमत्व विकास या विषयावर अत्यंत अभ्यासपूर्ण सादरीकरण केले.
शेवटी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रसाद खानझोडे यांनी अध्यक्षीय समारोप केला.
सर्व सहभागी मान्यवरांचे संयोजक डॉ. करमसिंग राजपूत यांनी आभार व्यक्त केले. या संपूर्ण दीक्षारंभ समारंभाची तांत्रिक बाजू डॉ. गुलशन कुथे, प्रा. मनोज जंत्रे, डॉ. अजय राजूरकर, प्रा. महादेव बुजाडे इ. नी समर्थरीत्या सांभाळली. उपक्रमाच्या उपयुक्ततेबद्दल सहभागी विद्यार्थी वर्गातर्फे समाधान व्यक्त करण्यात आले.