महसूल विभागातर्फे संगणकीकृत डिजीटल 7/12 वितरणाचा शुभारंभ
गोंडपिपरी – स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी राष्ट्रपिता महात्मा गांधी व स्वतंत्र भारताचे दूसरे प्रधानमंत्री लालबहादूर शास्त्री यांचा जयंतीचे औचित्य साधून नुकतच महसूल विभागातर्फे संगणकीकृत डिजीटल 7/12 वितरणाचा शुभारंभ करण्यात आला. शेतकर्यांसाठी आवश्यक असलेलं 7/12 डिजीटल स्वाक्षरीने संगणीकृत करून डिजीटल 7/12 आज गणपूर येथील शेतकऱ्यांना देण्यात आले. या कार्यक्रमाचा शुभारंभ जिप सदस्य वैष्णवी अमर बोडलावार यांच्या हस्ते पार पडले.
अध्यक्षस्थानी तहसीलदार के. डी. मेश्राम तसेच नयाब तहसीलदार जगदाडे, कृषी मंडल अधिकारी, कन्हाळगावचे सरपंच कूळमेथे, उपसरपंच शालूताई आत्राम, पोलीस पाटील, जिप शाळेचे मुख्याध्यापक उपेंद्र खोब्रागडे, शिक्षकवृंद आणि समस्त शेतकरी बांधव व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.