ग्रामरोजगार सेवकांच्या उपोषण मंडपाला आमदार व सभापती यांची भेट
वणी/यवतमाळ, मनोज नवले
महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत ग्रामपंचायत ग्रामसभेतून ग्रामरोजगार सेवकांची ग्रामसभेद्वारे नियुक्ती करते. ग्राम पंचायत स्तरावर काम जास्त मानधन कमी असल्याने सन २००६ पासुन ग्राम रोजगार सेवक ग्रामपंचायत स्तरावर अल्प मानधनावर काम करीत असून या रोजगार सेवकांना ग्रामपंचायत सेवेत कायम करून न्याय द्यावा अशा आशयाचे निवेदन दि.२० सप्टेंबर २०२१ रोजी तहसिलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना देण्यात आले होते. याच मागणीला घेऊन दि.२ ऑक्टोंबर गांधी जयंती निमीत्ताने ग्राम रोजगार सेवकांनी येथिल तहसिल कार्यालयासमोर एकदिवसीय लाक्षणीक उपोषण केले.
शासनाच्या प्रशासकीय खर्चाच्या निधीतून ६% मानधनावर कार्यरत असून सन २००६ पासून काम करीत आहे राज्यामध्ये बऱ्याच ग्रामपंचायतमध्ये नव्याने सत्तांतर झाल्यावर सूडबुद्धीने ग्रामरोजगार सेवकांना कामावरून कमी करून जाणीवपूर्वक अन्याय केला जातो त्यामुळे ही बाब अत्यंत गंभीर असून त्यामुळे ग्रामरोजगार सेवकांना त्रास होऊन निर्णयाला सामोरे जावे लागते व त्यांच्या कुटुंबाची पालनपोषणाची जबाबदारी कुटुंब प्रमुख म्हणून रोजगार सेवकांवर असल्याने त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ येत असुन त्यामच्यावर अन्याय होतो या बाबीची दखल घेऊन ग्रामरोजगार सेवकांना ग्रामपंचायत स्तरावर कायम करण्याचा निर्णय घेऊन राज्यातील सर्व ग्राम रोजगार सेवकांना ग्रामपंचायत सेवेत कायम करून न्याय द्यावा याकरिता २ ऑक्टोबर २०२१ रोजी महात्मा गांधी जयंती निमित्त फोटो पूजन करून वणी तहसील कार्यालयासमोर एकदिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले.
या उपोषण मंडपाला आमदार संजिवरेड्डी बोदकूरवार पंचायत समितीचे सभापती संजय पिंपळशेंडे यांनी भेट देऊन सर्व समस्या समजून घेतल्या व त्यांच्या समस्या शासन दरबारी मांडुन न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर उपोषणाची सांगता करण्यात आली.
यावेळी वणी तालुका रोजगार सेवक संघटनेचे अध्यक्ष अशोक टेकाम,सचिव दत्तात्रय गोरे, तालूका उपाध्यक्ष मंगेश रांखूंडे, रोशन खिरटकर,अमोल देवाळकर, हरिचंद्र पूनवटकर, अतूल सूर, दिनेश निमसटकर, धनराज ठाकरे, हेमंत सातपूते ईत्यादींसह तालुक्यातील सर्व ग्राम रोजगार सेवकांनी एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करून उपविभागीय अधिकार्यामार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठविण्यात आले.