वणी तालुक्यातील अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तात्काळ मदत द्या – जिप सदस्या मंगलाताई पावडे यांची मागणी
वणी/यवतमाळ, मनोज नवले
वणी तालुक्यात यंदा अतिवृष्टीने शेतीतील पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे.या हंगामात पावसाचे प्रमाण सरासरी पेक्षा जास्त आहे. एवढेच नव्हे तर सप्टेंबर महिन्यात सतत पाऊस पडल्याने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे.त्यातही एकाच दिवशी 85 मीली पाऊस पडला. ऑगस्ट महिन्या पर्यंत तालुक्यातील पिकांची स्थिती अतिशय चांगली होती. परंतु सप्टेंबर महिन्यात पावसानी हाहाकार माजवला आणि शेतीमधील पिके पूर्णता करपून गेली.कपाशीचे बोन्डे ही सडली, सोयाबीन बारीक व कोंबेही फुटली. तूर पिकावर अति पाऊसाने माररोग येऊन पीक उद्वस्त झाली. त्या शेतकऱ्यांना तात्काळ मदत करण्यात यावी, अशी मागणी जिप सदस्या मंगला पावडे यांनी विरोधी पक्ष नेते तथा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.