नांदा ग्रामपंचायतीच्या तंटामुक्ती समिती अध्यक्ष पदी रामदास पानघाटे
२ ऑक्टोबर महात्मा गांधी जयंतीच्या शुभमुहूर्तावर नांदा ग्रामपंचायतीच्या वतीने ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती त्या अनुषंगाने महात्मा गांधी तंटामुक्त गाव समिती अध्यक्ष निवडीचा विषय या सभेत ठेवण्यात आला होता यामध्ये माजी तंटामुक्ती अध्यक्ष किशोर मडावी दिलीप थेटे व नवीन उमेदवारांपैकी रामदास पानघाटे इत्यादीनी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष पदाकरिता उमेदवारी अर्ज दाखल केले होते निवडणूक प्रक्रिया राबविण्याकरिता विस्तार अधिकारी दिलीप बैलमवार, ग्रामपंचयत सचिव पंढरीनाथ गेडाम व ग्रामपंचयतीच्या कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेत निवड प्रक्रिया राबवली यात २०७ नागरिकांनी तंटामुक्त समितीचा अध्यक्ष निवडीसाठी मतदान बजावले यामध्ये श्री,किशोर मडावी यांना २५,तर श्री,दिलीप थेटे १५ व श्री,रामदास पाणघाटे बहुमताने १५४ यांची निवड करण्यात आली असून १३ मतदान अवैद्य ठरले आहे गावकऱ्यांकडून नवनियुक्त अध्यक्षाचे जल्लोषात स्वागत करण्यात आले असून ग्रामसभा ही अतिशय शांततेत पार पाडण्याकरिता पोलीस निरीक्षक सत्यजित आमले यांच्या मार्गदर्शनात पोलीस नागोबा बुऱ्हाण, संदीप आडकीने व सुनील मेश्राम यांचे बंदोबस्ता करीता योगदान लाभले.