गणपती विसर्जन स्थळी तगडा पाेलिस बंदोबस्त ठेवावा – मूल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने केली मागणी
अमोल राऊत
मूल : येथील गणपती विसर्जन स्थळी प्रशासनाच्या चुकीच्या नियोजनामुळे निष्पाप भक्तांचा नाहक बळी गेला. सदरहु ठिकाणी अपु-या सुविधा उपलब्ध असल्याने वेळीच मदत मिळु शकली नाही त्यामुळे एका युवकाचा तलावात बुडून मृत्यू झाला. म्रूतकाच्या परिवाराला शासनाकडून योग्य ती आर्थिक मदत मिळावी. तसेच विसर्जन स्थळी पाेलिस बंदोबस्त वाढविण्यात यावा. याकरीता मूल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे तहसीलदार जाधव यांना निवेदन देण्यात आले.
विसर्जन स्थळी पाण्याची खोली १५ ते विस फुट असून त्यामुळे चुकुन एखादी घटना घडू शकते. तिथे प्रशासना तर्फे केलेल्या उपाय योजना या अपु-या आहेत. प्रशासनाने तिथे बचाव दल, पोहनपटु तथा सुरक्षा रक्षक यांची नेमणूक करावी अशी मागणी देखिल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे बल्लारपूर विधानसभा क्षेत्र अध्यक्ष सोनल मडावी यांनी केली आहे.
निवेदन सादर करते वेळी गंगाधर कुनघाडकर, तालुका अध्यक्ष मूल, निताताई गेडाम, महीला अध्यक्षा, अर्चना ताई चावरे शहर अध्यक्षा, संदीप मेश्राम, ऊमेश नागोसे, राहुल बारसागडे, चंदन गुरनुले, विक्रम मडावी व इत्तर कार्यकर्ते उपस्थित होते.