ओबीसी विरोधी भाजपाचा वंचित तर्फे तीव्र निषेध
छ. शिवाजी महाराज चौकात लागल्या फडणवीस गो बॅकच्या घोषणा
वणी/यवतमाळ, मनोज नवले
सुप्रीम कोर्टात ओबीसी समाजाचा इंपेरिकल डाटा देण्यास नकार देणाऱ्या व राष्ट्रीय जनगणनेत ओबीसीचा स्वतंत्र कॉलम न देऊन जनगणना नाकारणाऱ्या भारतीय जनता पार्टीच्या व केंद्र सरकारचा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने येथील छ. शिवाजी चौकात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तीव्र निषेध करण्यात आला असून फडणवीस गो बँकच्या घोषणा आज ता.1 रोजी दुपारी 1१२.३० वा देण्यात आल्या असता स्थानिक पोलिसांनी वंचित च्या असंख्य कार्यकर्त्यांना स्थानबद्ध केले.
येथील नगर परिषदेच्या आयोजित छत्रपती शिवाजी महाराज उध्यानाच्या उद्धघाटन प्रसंगी राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस हे वणीत येणार होते. त्यामुळे ओबीसी समाजाच्या विरोधी भूमीका घेणाऱ्या भारतीय जनता पार्टी व केंद्र सरकारचा निषेध म्हणून वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष दिलीप भोयर यांचे नेतृत्वात व जिल्हा उपाध्यक्ष मंगल तेलंग, मिलिंद पाटील यांचे उपस्थितीत ओबीसी विरोधी फडणवीस गो बँक , ओबीसी विरोधी धोरण राबविणाऱ्या भाजपचा निषेध असो म्हणून प्रचंड घोषणा दिल्या व काळे झेण्डे दाखविण्यात आले. करतव्यावर असलेला पोलिसांनी वंचितचे तालुकाध्यक्ष दिलीप भोयर, जिल्हाउपाध्यक्ष मंगल तेलंग, मिलिंद पाटील, किशोर मुन, अमोल लोखंडे,प्रा. डॉ. आनंद वेले, नरेंद्र लोणारे, विलास दुर्गे, विजय दुर्गे, करण मेश्राम, धनंजय आसुटकर, धनराज नगराळे, अनिल पथाडे, शंकर रामटेके यांचे सह अनेक कार्यकर्त्यांना पोलीस निरीक्षक श्याम सोनटक्के यांच्या पोलीस उपनिरीक्षक शिवाजीराव टिपूर्णे, सुनील खंडागळे, रत्नपाल मोहाडे, दीपक वंड्रस्वार, वसीम शेख यांनी वंचित च्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना स्थानबद्ध केले.