खुद्द आमदारांच्या पुढाकाराने व सभापती यांचा सहकार्याने रुग्णवाहीकेचे लोकार्पण
वणी/यवतमाळ, मनोज नवले
राजूर कॉलरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्र येथे काल दिनांक 29 सप्टेंबरला नवीन रुग्णवाहिकेचे लोकार्पण आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्या हस्ते हा कार्यक्रम पार पडला.
वणी तालुक्याचे राजूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील नवीन रुग्णवाहिका आजारी पडल्याचे आढळून आले ” मात्र खुद्द आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार व पंचायत समिती सभापती संजय पिंपळशेंडे यांनी पुढाकार घेऊन रुग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा पार पाडला. अखेर आज रोजी रुग्णवाहिका जनतेच्या सेवेत देण्यात आली.
रुग्णवाहिकेच्या लोकार्पण सोहळ्याच्या उदघाटन प्रसंगी व्यासपीठावर पदाधिकाऱ्यांच्या भाषणे चालले .त्या भाषणात टोलेबाजी देखील झाली आणि ते रंगलेही हे विशेष… या कार्यक्रमाला अनेक ग्रामपंचायतीच्या सदस्यांना निमंत्रण दिल्या गेले नाही याबद्दल राजूर सरपंच विद्या पेरकावार यांचा भाषणाच्या माध्यमातून नाराजी व्यक्त करण्यात आली तेच बघता वणी सभापती यांनी देखील या टोलेबाजीत काहीही कसर सोडली नाही त्यात आरोग्य विभागाला चांगलेच धारेवर धरत मोठी टीका देखील केली.
कारण राजूर कॉलरी हे प्राथमिक आरोग्य केंद्र असल्याने अनेक गावांचा संबध आहे. या ठिकाणी बाजारपेठ, कोळसा खाणी, चुनखडी खान यासारख्या खाणी असल्यामुळे येथे प्रदूषण मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न हा महत्वाचा आहे.
या प्राथमिक केंद्रात सर्व सोयी-सुविधा असतांना केवळ कर्मचाऱ्यांची कमी आहे. त्यामुळे आरोग्य केंद्राचा मनस्ताप रुग्णांना सहन करावा लागत आहे. तसेच खनिज विकास निधीतून राजूर आरोग्य केंद्राला रुग्णवाहिका प्राप्त करून दिली व या रुग्णवाहिकेचा अखेर लोकार्पण सोहळा संपन्न झाला ..या सोहळ्याला वणी विधानसभा क्षेत्राचे आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार ,पंचायत समिती सभापती संजय पिंपळशेंडे , सरपंच विद्या पेरकावार , समाजसेवक अनिल डवरे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती