१०३ रुग्णांना मिळणार नवी दृष्टी
गोंडपिपरी(सुरज माडुरवार)
गोंडपिपरी तालुक्यातील धाबा येथे सुधीर मुनगंटीवार विधानसभा सदस्य यांच्या सहकार्याने संत परमहंस कोंडय्या महाराज संस्थान धाबा व जिल्हा सामान्य रुग्णालय चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतेच मोफत नेत्रतपासणी व मोतिबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन केले होते.
यामध्ये 103 रुग्णांची शस्त्रक्रिया साठी निवड करण्यात आली होती. टप्प्याटप्प्याने रुग्णांना शस्त्रक्रियेसाठी शासकीय रुग्णालयात पाठविण्यात येणार असल्याची माहिती संस्थांचे अध्यक्ष अमर बोडलावार यांनी दिली. यावेळी डॉ. लांजेवार,डॉ.पेंदाम,डॉ.बुराण, डॉ.गुनुरे यांच्या मार्गदर्शनात 513 रुग्णांची नोंदणी झाली 103 रुग्णांची शस्त्रक्रिया साठी निवड झाली यावेळी संस्थेचे अध्यक्ष अमर बोडलावार,अरुण कोडापे, किशोर अगस्ती ,स्वप्नील अनमूलवार, हिराचंद कंदिकुरिवार, बाबुराव बोमकटीवार, मनोज कोपावर, प्रकाश कावडे ,विठ्ठल चणकापूरे,शेगमवार ,संतोष येलमुले, संतोष मोगलवार,निखिल चंदनगिरीवार, साईनाथ खारकर,अखिल चंदनगिरीवर, अनिकेत नामेवार, रितीक हिवरकर यांच्यासह परिसरातील नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती