नांदाफाटा बाजारपेठेतील सट्टापट्टीला कोणाचा वरदहस्त
एकीकडे कारवाई तर दुसरीकडे सुट
नांदाफाटा (कोरपना), प्रतिनिधी : नवनियुक्त ठाणेदार रुजू होताच जुगार, सट्टा पट्टी धाडसत्र सुरू करून छापेमारी करून करवाई करण्यात आली व काही आरोपींना तुरुंगात रवाना केले. मात्र नांदाफाटा बाजारपेठेतील सट्टापट्टी खुले आम सुरू असल्याने साशकांता निर्माण झाली असून यावर कोणाचा वरदहस्त आहे असा प्रश्न जनसामान्यांना पडू लागला आहे.
नवनियुक्त ठाणेदार रुजू होताच लपून छपून सट्टापट्टी घेणार्यांचा ठावठिकाणा घेवुन कारवाया केल्या जात आहे तर दुसरीकडे मात्र सेटिंग असल्याने बेकायदा दुकानदारी लावुन बिनधास्तपणे नांदाफाटा बाजारपेठेत भरदिवसा सट्टापट्टी घेतली जात असल्याचे निदर्शनास येत आहे.
उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालय व नांदाफाटा पोलिस चौकी हकेचा अंतरावर असताना देखील सट्टापट्टी व्यवसाय सुरू असल्याने हा व्यवसाय शासनमान्य आहे की काय तसेच जवळच असलेल्या सट्टापट्टी व्यवसाय ठावठिकाणा नाही काय? असा नागरीकांना प्रश्न निर्माण झाला आहे.
गडचांदूर नांदाफाटा परिसरातील अवैध सट्टापट्टी, जुगार, कोंबडबाजार ही काही नवीन बाब नाही पोलीस कारवाई करतात तरीही अवैध धंदे चांगलेच फोफावले आहे झटपट श्रीमंतीच्या नादात जुगारात अनेकजण खाक झाले पण आशा सुटली नाही आज नाही तर उद्या हीच आशा लागली असते.
गडचांदुर नांदाफाटा परिसर औद्यागिक असल्याने येथे मोठा मजुर वर्ग असल्याने सट्टापट्टीचा व्यवसाय जोरात चालतो नांदाफाट्यावर लपुनछपुन सट्टापट्टी घेणार्या एकाला पोलीसांनी कारवाई करत अटक केली होती. रात्रभर पोलीस कोठडीत ठेवुन सकाळी मुचलक्यावर सोडले तर दुसरीकडे बाजारपेठत राजरोसपणे दिवसाढवळ्या खुलेआम सट्टापट्टी घेतली जाते. त्यांच्यावर कारवाई होत नाही. येथे दररोज ४० ते ५० हजार रुपयाची पट्टी घेण्यात येत असल्याची खात्रीलायक माहिती आहे.
अल्ट्राटेक कंपनी असल्याने याठिकाणी स्वतंत्र पोलिस चौकी देण्यात आली. २४ तास पोलिस कर्मचारी तैनात असतात. तरीही शासनमान्य अधिकृत व्यवसाय असल्यासारखा खुलेआम सट्टापट्टीचा जुगार चालतो. वरिष्ठ पोलीस प्रशासकीय अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊ येथील अवैध धंदे कायमस्वरुपी बंद करण्याबाबत कठोर कारवाई करणे गरजेचे आहे.
कुठे कारवाई करणारे हात तर बांधले गेले की काय असा सवाल नागरिक करीत असून वरिष्ठ पोलीस प्रशासकीय अधिकाऱ्यांनी गडचांदूर नांदाफाटा परिसरातील अवैध सट्टापट्टी जुगार बंद करण्याबाबत ठोेस कारवाई करणे गरजेचे आहे.